सोमवार, १८ मे, २०२०

पोहचेल का मी घरी

पोहचेल का मी घरी

शेती जिरायती होती
बाप खपतो रानातं
लग्न झाली भावंडाची
पोट भरेना शेतीतं

गाव सोडले सोडले
पोटं भरण्या जगातं
रोजी रोटी मुंबईतं
पोटं भरे मजूरीतं

चाले संसाराचा गाडा
मोजक्याच दमडीतं
वाढे जोर कोरोनाचा
माया नगरी मुंबेईतं

अरे पेटली पेटली
महा मुंबा राजधानी
सरकारा वाचव रे
तुला करी विनवणी

राजा मी ही शेतकरी
कामगार मुंबईचा
आहे बि-हाडं पाठी
रस्ता धरला गावचा

वाटं तुडवीतो आता
पोटं रिकामे घेऊनं
कधी जाईलं घरी मी
जीव मुठीतं धरुनं

- सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा