घंटेची ती टण टण
शिस्तीतल्या छान रांगा
केंव्हा करु मित्रात मी
मूक्त पणे धांगड धिंगा
मराठीचा एक तास
कविता होई झक्कास
केंव्हा शिकावा आता तो
सोपा गणितात व्यास
पृथ्वीचाही तो भूगोल
कवायती साठी ढोल
केंव्हा मिळेल मलाही
शाबासकी परी कौल
सुट्टी मधली ती छान
पाण्याचीही ती तहान
जेवताना सारेच होऊ
आम्ही मित्रही बेभान
आठवते आता मला
माझी ती सुंदर शाळा
रोज फुलतो तेथेही
आनंदाचा फुल मळा
- सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा