फुलं फुललेले, निखा-याच्या गर्भी।
झळा तया दर्भी, लागू नये। । १ । ।
बाग फुलण्याची,अपेक्षा लयाला।
दोष नशिबाला,देवू नये । । २ । ।
नसे केरं भावं,मनातला गावं ।
उकिरडा तव, दावू नये। । ३ । ।
आयुष्याचा मेळं, क्षण सोनचाफा।
प्रेमातला वाफा,फोडू नये। । ४ । ।
ज्वाला तांडवाची,कागदांची राखं ।
भावनांची खाकं, करु नये। । ५ । ।
चाफा सुगंधाचा, प्राजक्ताचा गंध।
मनातील बंध, तोडू नये । । ६ । ।
- सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा