दीप मंदावले आता
दीप मंदावले आता
गर्द काळोखाच्या राती
चंद्र अंशा मध्ये होता
गाणे तुझे चांदराती
फुलताना प्राजक्त तो
दरवळे गंध तुझा
घट अमृताचा मेघ
वसंत ही मनी माझा
रुपं पाहिलेस ज्यात
आरसा आंधळा होता
दिसले जे तुला तेथे
तुझाच तो रंग होता
सांज वेडी तोकडी ती
दिव्यांचा आरास होता
रोशनाई तुझ्या मध्ये
दिवा तेथे मंद होता
गर्द काळोखाच्या राती
मनात एक संचार होता
सूर आळवलेस तेथे
ऐकनारा बहिरा होता
- सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा