सोमवार, ११ मे, २०२०

जांभूळबेट

जांभूळ बन

गोदा पात्रामधे आहे
बन जांभळीचे बेटं
परभणी जिल्ह्यातले
नाव ते जांभूळंबेटं

वेली झुले झाली बनी
मोरं नाचे आनंदातं
रिमझीमं पावसाची
पक्षी उडे गगनातं

पूर नदीला येताचं
गोडं फळं जांभळीचे
दातं जीभं ओठं लालं
रंग दिसे जांभळीचे

चिंचेकडे जा जपूनं
मध माशांचे मोहळं
खडा कोणीही मारीता
डंक माशांचे भोवळं

रेती सुरेखं मैदानी
जशी सागरं किनारं
उडी टाकता पाण्यातं
अंगं रोमांचीतं सारं

#सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा