रविवार, १० मे, २०२०

आई

आई 

आम्हां भावंडाची आई
रुढी जपणारी बाई
ममतेचा ती सागरं
होती माझी अशी आई

साधी भोळी श्रध्दावानं
हृदयात होता भावं
तिची परखड वाणी
ममतेचा आम्हा गावं

मूल चूकते वर्तनी
चूक पदरी ती घेई 
मोठ्या मनाची ती होती
एक संयमीत बाई

होती झडपं काळाची
आई पडली आजारी
कोणी नव्हते शेजारी
झाली तिची ही बेजारी

डाॕक्टरांचा बोल आला
आहे किडनी नाजूकं
मृत्यू मनाला चटका
गेला देऊन दाहकं

कोसळल्या आभाळाला
वाट हुंदक्यांची होती
जगी मायेचा ती झरा
साथं आठवांची होती

- सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा