रविवार, ३ मे, २०२०

लाटा

#लाटा

येता भरतीच्या लाटा
मन ही होते उदासं
तुझ्या माझ्या दुराव्यात
होते सांजही भकासं

माझ्या मनाचा तळ
तुझ्या शब्दांत झरतो
शब्द पेलताना भाव
एका प्रीतीत थांबतो

चंद्रालाही भेटण्या त्या
सागरा उधान येते
मग अपसुकच त्या
किना-याला लाट येते

माझा मी नसतो कधी
तळ प्रीतीचा गाठता
क्षण अंधाराच्या भेटा
शब्द शब्द रेखाटता

होते वादळ दोघांत
चक्र नियतीचे होते
चाल चालून जे आले
मौसमाचे वारे होते

दुर आताच का जावे
प्रीत ओहटी का व्हावे
चंद्र पृथ्वीचे ओढे ते
विसरुनी कसे जावे

#सोमनाथ_पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा