गझल संबंधी माहिती-(संकलित)-भाग-1 (कंसात दिलेले शब्द मूळ अरबी भाषेतिल आहेत.) 1) गझल शेवट पर्यंत एकाच वृत्तात(बहर) असली पाहिजे. 2) वृत्त (बहर) , यमक (काफिया) , अंत्य यमक (रदीफ) हे गझलेचे तीन प्रमुख घटक आहेत. 3) अंत्य यमक (रदीफ) कायम असते,त्यात बदल होत नाही.यमक (काफिया) चे वजन(Form) कायम असतो, पण तसेच वजन असलेले शब्द बदलतात. 4) यमक जर अनुनासिक असेल तर, गझल मधील सर्व यमके ( काफिये किंवा कवाफी), तशिच असली पाहिजेत. ऊदाहरणार्थ- संसार हे यमक असेल तर, प्रत्येक शेर च्या दुसर्या ओळित, अंगार, गंधार ,शृंगार अशिच अनुनासिक यमके असावी. 5) प्रत्येक गझलेत ,दोन-दोन ओळिंचे, कमित कमी पाच शेर असले पाहिजेत. पाच पेक्षा जास्त शेर असल्यास चालते. 6) गझल मध्ये चुकूनही भरतीचे अनावश्यक शब्द येणे अपेक्षित नाही. ( क्रमश:)
गझल
शारदा-स्वागत
लगावली (गालगागा x4 )
सूरदरबारात यावे,शारदेच्या स्वागताला
नादब्रह्मा जागवावे,शारदेच्या स्वागताला ।
वंदुनीया शारदेला,भावसुमने वाहताना
शब्दब्रह्मा आज गावे,शारदेच्या स्वागताला ।
अंतरंगी नाचवावे,तू स्वरांगी रंगताना
योगब्रह्मा गात जावे,शारदेच्या स्वागताला ।
पाच कोषे शुध्द होती,रागदारी गायनाने
अन्नब्रह्मा आज यावे,शारदेच्या स्वागताला ।
सरस्वती प्रगटावयाला, आर्त माझी साद आहे
ज्ञानब्रह्मा आठवावे,शारदेच्या स्वागताला ।
सूर-तालांनी धरावा,काळजाचा ठाव आता
मूक्त ब्रह्मा बागडावे,शारदेच्या स्वागताला ।
धवल वस्रांगी विणेसह,मोरवाहन प्रगटताना
आज श्रोते या सत्वरे , शारदेच्या स्वागताला
प्रा.डाॅ.रे.भ. भारस्वाडकर, औरंगाबाद,मो.9730093331