शनिवार, २ जानेवारी, २०२१

सांज

सांज*

सांज ही धुंद सावळी
तेज लाली मित्राचळी
भारावले अंबर हे
जणू कुंकूम आभाळी

दूर मंदिरी कलश
त्याचे चकाकते तेज
लाल किरणांचा मारा
त्याची शिखरी ती सेज

जणू तो कलशावरी
गोळा सूर्य लालेलाल
शोभे मुकूटमणी तो
ढगांचाही आहे ताल

सुगी भरात ती रानी
झाले निःशब्द हे वृक्ष 
माथ्यावरी डोंगराच्या
देती ढगही ते साक्ष

धावे पांदीवरुन ती
जोडी सरजा राजाची
गाडी घेऊन घंट्याचा
नाद करी घुंगुराची

मंदिराच्या ही पल्याडं
आहे नदी शांत क्लांतं
तिच्या किनारी ते गावं
उभे मोठ्या दिमाकातं
------------------------------------
*- सोमनाथ पुरी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा