बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

कोल्हापूरी मिर्ची (लावणी)

***********************************
*स्पर्धेसाठी*
*शब्दरजनी साहित्य समूह आयोजित*
*भव्य राज्यस्तरीय लावणी लेखन स्पर्धा*
*दि. ३०/१२/२०२०, बुधवार*
***********************************
*विषय : कोल्हापूरी मिर्ची*

लागती तिखट चांगली लालभडक ही मिरची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची ||धृ||

आला थंडीचा महिना जीवाची झाली दैना
वरण भात, भाजीचा पांचट पणा तो जाईना
जीभीला चटका आवड मी आहे सा-यांची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची ||१||

म्हाता-याला लागते खमंग ठेचा अन भाकरी
तरण्यालाही आहे माझ्यातच गोडी लय भारी
भर ज्वानीत आहे, गावरान लालेलाल मिरची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची ||२||

थंडीत गरमी गरमीत नरमी मिरची लाल सस्ती
चव जरा तोंडानी घ्या ना जीरवा तुमची मस्ती
हिरव्या देठाची आहे भर पाडात लाल मिरची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची||३||

**********************************
*- सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
**********************************

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

काव्यांजली

🌹🌾🌹🌾🌹🌾🌹
गाली तुझ्या
आज लाली पाहिली
झाली काहिली
हृदयाची 🍁

निःशब्द भाव
दरवळत असतो सुगंध
परिमळ बंध
मनोमनी 🍁

गुलाबी सहवास
करतो बेधुंद मनाला
रोमांच क्षणाला
एकांतवेळी 🍁

नीत्य नावीन्य
रोज झळकते अदाभारी
मूर्ती संगमरवरी
हृदयांतरी 🍁

स्मित रुबाबी
बट शोभे भाळी
तेज झळाळी
नेत्रपालवी 🍁

🌹🌾🌹🌾🌹🌾🌹
*सोमनाथ पुरी*
🌹🌾🌹🌾🌹🌾🌹

प्रीत गुलाबी थांडीची (लावणी)

*उपक्रमासाठी*
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
*शब्द रजनी साहित्य समूह आयोजित*
*लावणी उपक्रम*
*विषय : प्रीत गुलाबी थंडीची*
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
*प्रीत गुलाबी थंडीची....*

मौसमात आली बहार, रानामधी ही सुगीची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची||धृ||

सोळा श्रृंगार केला राजसा हा तुमच्यासाठी 
राया आता!अहो सख्या आता! घ्या एक मिठी
पहा कशी नभी लाली पसरली तिन्ही सांजेची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची ||१||

थंडी वाढली झोंबणारी, गोरी काया थरथरली
तुम्हा पाहून मनात वेंधळी भावना सळसळली
अहो सख्या आता ऊब द्या ना जरा पिरतीची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची ||२||

तारांगणे ही फुलली, रात चांदण्यात शहारली
सख्या पहा ना आता कशी रात धुंद नशीली
बघा भर ज्वानीत कशी कामिनी हि मदनाची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची ||३||

*- सोमनाथ पुरी*
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

घुंगरु (लावणी)

 *घुंगरु* (लावणी)

साज श्रृंगार केला सख्या, मी राणी प्रीतीची ||
पायी चाळ घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रीतीची ||धृ.||

नखरा केला नथीचा, साडीवर शोभे मोर पिसे
भर यौवनात रसरसलेली ज्वानी माझी दिसे
त्यावर खूले पिवळी धमक नऊवारी जरीची
पायी चाळ  घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रीतीची ||१||

काढीते रांगोळी प्राजक्ताची मी तुझ्या अंगणी
मोगराही कसा बहरला,मी गज-याची दिवाणी
माळ वेणीत गजरा दिलबरा, मी राणी प्रीतीची
पायी चाळ घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रितीची ||२||

उडवून दे एकदा बार इश्काचा रंगमहाली
राजसा टच्च अंगभर ज्वानी ही रसरसली
मी भूकेली सख्या दिलबरा तुझ्या प्रीतीची
पायी चाळ घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रीतीची ||३||

*सोमनाथ पुरी*

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

गीत म्हणजे काय?

*गीत म्हणजे काय*

शब्दरचनेला सुरावट किंवा स्वररचना प्राप्‍त करून दिली तर ती शब्दरचना गीत बनते. शब्दरचना ही शब्दांच्या उच्चारांच्या ज्या समाजमान्य पद्धती आहेत तिच्यातून जन्माला येत असते. ती करताना प्रत्येक ओळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारा शब्दसमूह हा एक कालिक रचना घडवितो. अनेकदा विशिष्ट अंतराने तोच तो उच्चार येतो आणि आपणास लयपूर्ण बांधणी प्रतीत होते. कवितेच्या या अंगभूत लयीवर सुरांची एक रचना बसविली गेली की ती कविता गीत बनते. संगीतातील स्वररचनेमध्ये कवितेतील शब्द बसविले की गीत तयार होते.


*ध्रुवपद म्हणजे काय ?* *मुखडा म्हणजे काय ?*

ध्रुवपद म्हणजे गाण्याची सुरुवात. त्याला मुखडाही म्हणतात. गाण्याची सुरुवात दोन ओळी किंवा चार ओळीने लिहिता येते. यात छंद आणि मात्रा मध्ये या दोन्ही पद्धतीने गाण्याची रचना लिहिता येते.

*अंतरा म्हणजे काय?*

मुखडाच्या ओळी संपल्यावर नंतर ज्या ओळी सुरू होतात. त्यांना अंतरा म्हणतात. कोणत्याही गाण्यात एका कडव्यात  चार किंवा पाच ओळी असतात.
अंतरीच्या ओळी तीन ओळी असतात. चौथी ओळ ही मुखडा ओळीची असते. अंतरीच्या ओळी ध्रुवपदास समरूप असायला हवी. रचनेत लय,ताल, आशय, यमक असावा. गाण्याच्या ओळी अर्थपुर्ण असाव्यात.सहज गुणगणता यावी आणि चाल लावता यावी अशी रचना असावी. कोणत्याही गाण्याची कडवी ३,४, त्याही पेक्षा जास्त कडवी असू शकतात.

*मीटर म्हणजे काय*?
पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दांपर्यंतचे जे त्याला मीटर असे म्हणतात.
गीत लिहिताना मीटरचे अंतर कमी असावे. गीत सहज गुणगुणता व चाल लावता यावी असे असावे. 

*गीत प्रकार*
अभंग , गझल , लावणी , बालगीत ,भावगीत , भक्तीगीत, देशगीत ,लोकगीत, ओवी, गवळण, पोवाडा असे अनेक गीतेचे प्रकार आहेत.

१) गीत प्रकार :- लावणी

आज आपण लावणी गीत प्रकार बघणार आहोत. लावणी हा काव्याचाच प्रकार आहे. लावणी वाड्:मयाचा अभ्यास करताना... प्रथम आपण तिची शैली पहाणार आहोत . तिची मांडणी, काव्यात्मकता कशी असते रचना लिहिताना या गोष्टी घ्यावा लागतात. गीतांमध्ये सुर,ताल आणि भाव यांचा मधूर संगम असतो. लापनिका या संस्कृत शब्दावरून लावणी हा शब्द तयार झाला असावा. लवण म्हणजे सुंदर...लवण या शब्दावरून लावण्यगीत व लावणी शब्द तयार झाला असावा. लावणी शृंगाररसाचा मानसिक पाया आहे ‌. लावणी हे ग्रामीण गीत आहे. ग्राम्यता, शृंगार व गेयता या तीन लक्षणांसोबत नृत्यात्मकता हे लावणीचे लक्षण आहे. सजण व साजणी यांची मनाला धुंद करणारी चित्र लावणीत आढळतात.लावणीचे अंतरंग सुंदर व रसपूर्ण ती म्हणण्याचा ढंग ही नखरेबाज आहे. वीरश्री आणि शृंगार हे तारूण्याला शोभणारा विषय आहे. लावणी लिहिणे सोपे नाही. वीर, कारूण्य, शृंगार यांची मांडणी म्हणजेच लावणी असते. लावणी लिहिताना आपल्या नजरेसमोर तशी बैठक आणि बाज ठेवावा लागतो. शृंगारशिवाय लावणीत मजा नाही. नुसताच शृंगार रस नाही तर नऊरसांनी ती सजलेली आहे. म्हणून ही लावणी नऊवारीत सादर केलेली आपण नेहमी पाहत आलो आहे. ह्रदयाला चटका लावणारी आणि विशेषतः स्त्री सौंदर्य वर्णन असणारी लावणी आपण शिकणार आहोत.

*लावणीचे प्रकार*

(१) शाहिरी लावणी : डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिराने पद्यमय कथन वा निवेदन पेश करण्यासाठी गायलेली लावणी. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात.

(२) बैठकीची लावणी : तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. ह्या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि माफक अभिनयाची, तसेच रागसंगीताची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते.

(३) फडाची लावणी : नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणरी लावणी. ‘बालेघाटी’ (विरहदुःखाची भावना आळवणारी), ‘छक्कड’ (उत्तान शृंगारिक), ‘सवाल-जवाब ’ (प्रश्रोत्तरयुक्त), ‘चौका’ची (दीर्घ चार कडव्यांची वा चार वेळा चाली बदलणारी) रचना फडावर सादर केली जाते.

*सौ. अनिता आबनावे* ©®

लावणी उपक्रम

🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️

*उपक्रम    उपक्रम    उपक्रम*

*शब्दरजनी साहित्य समूह*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम लावणी गीत लेखन*

*विषय:- घुंगरू*

*दिनांक:-२८/१२/२०२०*

*लावणी गीतरचना नियम*

♥️  *पहिल्या दोन ओळी ध्रुवपदाच्या असाव्यात*

♥️  *दोन्ही ओळीत शेवटी यमक असावे*

♥️  *चार ओळींची तीन कडवी असाव्यात*

♥️  *दोन दोन ओळीत यमक असावे* 

♥️  *चौथी ओळ ध्रुवपदाची असावी*

♥️  *त्यानुसार लावणीगीत रचना लिहावी*

♥️  *लावणी लयबध्द, सहज गुणगुणता यावी अशी असावी*

🔴   *लावणीचा बाज हा शृंगारीकच हवा,त्यातील लकब,अदाकारी,शृंगार सुंदर शब्दात लिहावे*

🔴.  *लावणीतील प्रत्येक ओळ अर्थपूर्ण असावी*

*लावणी लिहिणे सोपे नाही तरीही सुध्दा काही जुनी गाणी अभ्यासू शकता... अभ्यासाठी चित्रपटातील जुनी लावणी ऐकून त्यानुसार अभ्यास करावा*


*लावणी म्हटले की शृंगार हा हवाच , आपल्या छान छान शब्दांनी सजवावी नऊरसात ही लावणी, पण लक्षात असू द्या तीन ओळींचा अंतरा घेऊन तिसरी ओळ ध्रुवपदास समरूप व्हायला हवी. लावणी लिहिताना अश्लिलता नको, आपल्या  समूहामध्ये महिला वर्ग आहे याचे भान ठेवावे. लावणीत ठसकेबाज शब्दांचा उपयोग करावा .लावणी सहज गुणगुणता यावी अशा शब्दांची मांडणी करावी. प्रत्येकाची लावणी सुंदर  अविस्मरणीय लावणी व्हायला हवी आहे*
*चला शब्दरजनीकर लिहायला सुरुवात करा*
👍👍👍

=======================

*समूह मार्गदर्शिका*
*कवयित्री राजश्री भावार्थी*
*कवयित्री अनिता आबनावे*

*समूह संचालिका*
*कवयित्री अनिता आबनावे*

*आयोजक*
*शब्दरजनी साहित्य समूह*

🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️

गीत म्हणजे काय?

[27/12, 11:47 PM] Abnave Anita: *गीत म्हणजे काय*

शब्दरचनेला सुरावट किंवा स्वररचना प्राप्‍त करून दिली तर ती शब्दरचना गीत बनते. शब्दरचना ही शब्दांच्या उच्चारांच्या ज्या समाजमान्य पद्धती आहेत तिच्यातून जन्माला येत असते. ती करताना प्रत्येक ओळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारा शब्दसमूह हा एक कालिक रचना घडवितो. अनेकदा विशिष्ट अंतराने तोच तो उच्चार येतो आणि आपणास लयपूर्ण बांधणी प्रतीत होते. कवितेच्या या अंगभूत लयीवर सुरांची एक रचना बसविली गेली की ती कविता गीत बनते. संगीतातील स्वररचनेमध्ये कवितेतील शब्द बसविले की गीत तयार होते.


*ध्रुवपद म्हणजे काय ?* *मुखडा म्हणजे काय ?*

ध्रुवपद म्हणजे गाण्याची सुरुवात. त्याला मुखडाही म्हणतात. गाण्याची सुरुवात दोन ओळी किंवा चार ओळीने लिहिता येते. यात छंद आणि मात्रा मध्ये या दोन्ही पद्धतीने गाण्याची रचना लिहिता येते.

*अंतरा म्हणजे काय?*

मुखडाच्या ओळी संपल्यावर नंतर ज्या ओळी सुरू होतात. त्यांना अंतरा म्हणतात. कोणत्याही गाण्यात एका कडव्यात  चार किंवा पाच ओळी असतात.
अंतरीच्या ओळी तीन ओळी असतात. चौथी ओळ ही मुखडा ओळीची असते. अंतरीच्या ओळी ध्रुवपदास समरूप असायला हवी. रचनेत लय,ताल, आशय, यमक असावा. गाण्याच्या ओळी अर्थपुर्ण असाव्यात.सहज गुणगणता यावी आणि चाल लावता यावी अशी रचना असावी. कोणत्याही गाण्याची कडवी ३,४, त्याही पेक्षा जास्त कडवी असू शकतात.

*मीटर म्हणजे काय*?
पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दांपर्यंतचे जे त्याला मीटर असे म्हणतात.
गीत लिहिताना मीटरचे अंतर कमी असावे. गीत सहज गुणगुणता व चाल लावता यावी असे असावे. 

*गीत प्रकार*
अभंग , गझल , लावणी , बालगीत ,भावगीत , भक्तीगीत, देशगीत ,लोकगीत, ओवी, गवळण, पोवाडा असे अनेक गीतेचे प्रकार आहेत.

१) गीत प्रकार :- लावणी

आज आपण लावणी गीत प्रकार बघणार आहोत. लावणी हा काव्याचाच प्रकार आहे. लावणी वाड्:मयाचा अभ्यास करताना... प्रथम आपण तिची शैली पहाणार आहोत . तिची मांडणी, काव्यात्मकता कशी असते रचना लिहिताना या गोष्टी घ्यावा लागतात. गीतांमध्ये सुर,ताल आणि भाव यांचा मधूर संगम असतो. लापनिका या संस्कृत शब्दावरून लावणी हा शब्द तयार झाला असावा. लवण म्हणजे सुंदर...लवण या शब्दावरून लावण्यगीत व लावणी शब्द तयार झाला असावा. लावणी शृंगाररसाचा मानसिक पाया आहे ‌. लावणी हे ग्रामीण गीत आहे. ग्राम्यता, शृंगार व गेयता या तीन लक्षणांसोबत नृत्यात्मकता हे लावणीचे लक्षण आहे. सजण व साजणी यांची मनाला धुंद करणारी चित्र लावणीत आढळतात.लावणीचे अंतरंग सुंदर व रसपूर्ण ती म्हणण्याचा ढंग ही नखरेबाज आहे. वीरश्री आणि शृंगार हे तारूण्याला शोभणारा विषय आहे. लावणी लिहिणे सोपे नाही. वीर, कारूण्य, शृंगार यांची मांडणी म्हणजेच लावणी असते. लावणी लिहिताना आपल्या नजरेसमोर तशी बैठक आणि बाज ठेवावा लागतो. शृंगारशिवाय लावणीत मजा नाही. नुसताच शृंगार रस नाही तर नऊरसांनी ती सजलेली आहे. म्हणून ही लावणी नऊवारीत सादर केलेली आपण नेहमी पाहत आलो आहे. ह्रदयाला चटका लावणारी आणि विशेषतः स्त्री सौंदर्य वर्णन असणारी लावणी आपण शिकणार आहोत.

*लावणीचे प्रकार*

(१) शाहिरी लावणी : डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिराने पद्यमय कथन वा निवेदन पेश करण्यासाठी गायलेली लावणी. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात.

(२) बैठकीची लावणी : तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. ह्या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि माफक अभिनयाची, तसेच रागसंगीताची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते.

(३) फडाची लावणी : नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणरी लावणी. ‘बालेघाटी’ (विरहदुःखाची भावना आळवणारी), ‘छक्कड’ (उत्तान शृंगारिक), ‘सवाल-जवाब ’ (प्रश्रोत्तरयुक्त), ‘चौका’ची (दीर्घ चार कडव्यांची वा चार वेळा चाली बदलणारी) रचना फडावर सादर केली जाते.

*सौ. अनिता आबनावे* ©®
[27/12, 11:59 PM] Abnave Anita: लावणी 
विषय :- लाखात एक शुक्राची चांदणी

कुहू कुहू कोकीळा गाते प्रेमात मंजुळ गाणी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी

नेसली भरजरी साडी पैठणी नऊवारी
ओठांवर लाली साज गळ्यात कोल्हापूरी
बांगड्या वाजे खणखण ज्वानीत धुंद होऊनी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी

गोरी गोरी माझी काया गालावर खळी
यौवनात उमलते जशी गुलाबाची कळी
झालं वरीस सोळा बहरत आली ज्वानी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी

नजर नका लावू नेत्री लावली कोरीव काजळी
लाल कुंकवाचा टिळा चंद्राची कोर कपाळी
उमटे दिलावर राया राज करते ही इश्काची राणी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी

.....सौ. अनिता आबनावे ©®
[28/12, 12:04 AM] Bhavarthi Rajashri: लगीनाची घाई का हो झाली कारभारी*!
*साजशृंगारी ललना नटूनी...नेसली नऊवारी !!धृ!!*

आणालं का हो राया पैठणी पिवळीजर्द...
बघून तुम्हांस्नि होतील सख्या साऱ्याच सर्द !
मर्दानी बाणा तुमचा पाहता भुलले हो स्वारी ...
*साजशृंगारी ललना नटूनी...नेसली नऊवारी !!१!!*

लावण्य सुंदरी मनात खूप भरली ..
पहावया तिला पाव्हणं गोळा झाली !
स्वागतासी त्यांचा मंडप घातला दारी !
*साजशृंगारी ललना नटूनी ...नेसली नऊवारी !!२!!*

भरजरी शालूचा पदर सावरत ..
नटखट ऐश्वर्या निघाली बावरत !
अक्षतेसाठी हो खोळंबली सारी !
*साजशृंगारी ललना नटूनी ...नेसली नऊवारी !!३!!*

सौ राजश्री भावार्थी
        पुणे
[28/12, 12:06 AM] Bhavarthi Rajashri: विषय - आरसा*

*भिगिभिगी पावलं माझी आरशापुढे धावली.....!*
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी, मनी खूप लाजली !! धृ !!*

बुगडी माझी सावरत हो, वाट तुमची अडवते ....
वर्खाचा गोविंद विडा, तुमच्यासाठी गुंफते !!
कोमल काया माझी, तुमच्या प्रेमात बुडाली...
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी, मनी खूप लाजली!!१!!*

कारभारी आता तुम्ही जरा दमानं घ्या ...
आरशात माझं देखणं रूप, हे पाहून घ्या !!
पिळदार रुबाबाची भुरळ, या दिलावर पडली ...
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी, मनी खूप लाजली !!२!!*

मनीचं माझ्या गोड गुपित,हे सांगून झालं....
काया तुमची बघून माझं अंग शहारलं !!
पिरतीच्या चांदण्याची उधळण, अंगणभर पसरली ..
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी,मनी खूप लाजली!!३!!*

   ©️  *राज*

*सौ राजश्री भावार्थी*
         *पुणे*

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

सुनीत


सुनीत

तुझ्या भेटीने काहूर मनी माजतो
का मजला नजर ही तुझी छळते?
पाहून तुला अंतःकरण पिळवटते
मग भाव मनी तुझाच माझ्या दाटतो

देशील तू ही हात हाती माझ्या
चिंतनात किती मी असतो तुझ्या?
नको प्रेमाचा चौघात गाजा वाजा
अशा प्रसिध्दीची नसते प्रेमात मजा

कुढत असशील तू ही मनोमन प्रिये
मी एकांतात गातो तुझेच प्रीत तराणे
का जीवाला घोर लावी नुसता सये ?
एकांतवासी घेऊयात मजेत उखाणे

विरहात तुझ्या असेच मी बडबडतो
सांजवेळी शब्दांत थोडा गडबड 

~ सोमनाथ पुरी

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

शृंगार तुझा...

जीव माझा रंगला सखे
प्रीतीत तुझ्या खरा
काय करु उमजेना मला
दे शब्दांचा आसरा 🍁

दिसता तू होतो धूंद मी
उमलू दे प्रीत ही
रातराणीची दरवळ
येते कशी बघ ही 🍁

नको दुरावा असा आता
जप भाव तू असा
प्राजक्ताचा सडा अंगणी
यावा सुगंध तसा 
🍁
तू अबोली बागेतील ती
मी निःशब्द भ्रमर 🐝
स्मित तुझे फुल पाकळी🌷
मी मोती दहीवर🍁

कमल नेत्री काजळ ते
पाणीदार तरल👀
रेखीव भुवया जणू गं
नक्षी शिल्प सरल
🍁
आवर पदर जरासा
खांद्यावर तो आला
नाजुक बांधा चंचला तू
मनी ताबा सुटला🍁

तू स्वप्न परी घोर जीवा
मनी मोर नाचरा 🦃
देखे तुला तरुण होतो
जरी असे बोचरा
🍁
हजर जबाबी चाणाक्ष
वैभव ते बुध्दीचे
शब्दाशब्दांत मांडीशी तू
गीत प्रेम धुंदीचे😍

नजरा खिळवूनी राही
चाहूल ती लागता
हृदये चोरुन घेशी तू💕
सर्वांचे जाता जाता  💃

 🎅 सोमनाथ पुरी✍ 🎅


शेतकरी

#शेतकरी

बळी राजा
कुनब्यांचा
घास सुखी
पोशिंद्याचा

दैन्य दैवी
आले आज
आत्महत्या
जरी काज

कर्ज सदा
डोई त्याच्या
अन्न तोंडी
खव्वयाच्या

सिंचनाची
त्याची आस
कोण नेई
पूर्णत्वास?

धोतरही
मळकट
अंगी बंडी
कळकट

उध्दारणे
कष्ट त्याचे
कर्तव्य हे
ही सर्वांचे

#सोमनाथ _पुरी

स्मृती गंध

*स्मृती गंध*

स्वप्नी येणे
पूरे झाले
निःशब्द हे 
भाव झाले

वळूनी तू
बघ आता
प्राण माझा
जाता जाता

तारांगणे
निष्प्रभ हे
फुले झाले
निस्तेज हे

सांजवेळ
स्मृती येती
अंधकारी
मला नेती

गुंग मती
तुझ्याविना
चांद जसा
ता-या विना

परतूनी तू
येशील का?
श्वास माझा
होशील का?

*सोमनाथ पुरी*



बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

सुरेश भटांचे शेर

सुरेश भटांचे  शेर.सगळी अ पासून ज्ञ पर्यंत अक्षरे आहेत 


(अ)
अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?...सुरेश भट.
*
(आ)
आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली...सुरेश भट.
*
(इ)
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते....सुरेश भट.
*
(ई)
'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?...सुरेश भट
*
(उ)
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली....सुरेश भट.
*

(ए)
एक मी निःशब्द किंकाळीच होतो 
ऐकण्यासाठी सुना बाजार होता ….सुरेश भट.
*
(ऐ)
ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले...सुरेश भट.
*
(ओ)
ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो...सुरेश भट.
*



(क)
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली....सुरेश भट.
*
(ख)
खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?....सुरेश भट.
*
(ग)
‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’...सुरेश भट.
*
(घ)
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते...सुरेश भट.
*
(च)
चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!.....सुरेश भट.
*
(छ)
छाकटे दुर्वास का निवृत्त झाले?
शापितांनी काय छाट्यांचे करावे?..... सुरेश भट.


(ज)
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!’....सुरेश भट.
*
(झ)
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.
मातीत पावलांचे काही ठसेच होते!....सुरेश भट.
*
(ट) 
टाकली हातातली मी सर्व पाने
कोण,जाणे,हारलो की जिकलो मी...सुरेश भट. 


(ठ)
ठेवले मी तयार ओठांना
एकदा तू पुकार ओठांना...सुरेश भट.

(त)
तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही....सुरेश भट.
*
(द)
दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता....सुरेश भट. 

*
(थ)
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्या  कसलीच खंत नाही....सुरेश भट.
*
(ध)
धन्य ही श्रद्धांजली जी वाहिली मारेक~यांनी,
संत हो आता बळीचा न्यायनिर्वाळा कशाला ?.....सुरेश भट.

(न) 
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा....सुरेश भट.
*
(प) 
पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!....सुरेश भट.
*
(फ)
फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते....सुरेश भट.
*
(ब)
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!...सुरेश भट.
*
(भ)
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एव्हढे मी भोगिले की मज हसावे लागले ...सुरेश भट.

*
(म)
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !...सुरेश भट.
*
(य)
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते...सुरेश भट.
*
(र)
रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे...सुरेश भट.
*
(ल)
लागले न झाडांना दोनचार शिंतोडे
नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा....सुरेश भट.
*
(व)
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?...सुरेश भट.
*
(श)
शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या
हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही....सुरेश भट.
*
(स)
सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा,
तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती....सुरेश भट 
*

हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा....सुरेश भट.
*

ज्ञानदेव लिहुनी गेले ओळ ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी....सुरेश भट.

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

ग्रहमाला

ग्रहमाला

सूर्य एक
ग्रहमाली
तेज त्याचे
सर्वकाली

बुध ग्रह
तो कक्षेच्या
नजदीक
आदित्येच्या

शुक्राची ती
तेजस्वीता
पहाटेची
तपस्वीता

नीलवर्णी
वसुंधरा
सर्वग्रही
ती सुंदरा

मंगळाचा 
थाट न्यारा
ताम्र तेज
पृष्ठ प्यारा


 ग्रह गुरु
मोठा असे
चन्द्र त्याचे
बहु असे

शनिची ती
कडा छान
ज्योतिष्यात
तो महान

~सोमनाथ पुरी


चाराक्षरी नियम

🌹🙏🏻साहित्य उपक्रम🙏🏻🌹

उपक्रम क्र २ - चाराक्षरी लेखन 

दिनांक : २२-१२-२० ते २६-१२-२०(मंगळवार ते शनिवार)


वेळ : ८-१०

नमस्कार!!🙏🏻🙏🏻

मागच्या आठवड्यात आपण शिरोमणी काव्य शिकलो. सर्वांनी छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार.🙏🏻😊

आता आजपासून आपण बघुया... चाराक्षरी.....तर तयार राहा एक नवीन काव्यप्रकार शिकायला.🙏🏻😊👍🏻

*चाराक्षरी*
        *चाराक्षरी* हा काव्यप्रकार प्रणाली म्हात्रे यांनी निर्मिला आहे. म्हणून हा काव्यप्रकार *' प्रणु* *चाराक्षरी*' या नावानेही प्रचलित आहे. हा काव्यप्रकार अगदी साधा, सोपा, सहज आहे.

*नियम*
१. प्रत्येक ओळीत फक्त चारच वर्ण अक्षर असायला हवेत.
२. कमीतकमी ६ आणि जास्तीत जास्त १० कडवे असावीत.
३. विराम चिन्हांचा आवश्यक त्या तेथे वापर असावा.
४. कवितेला आशय, लय, ताल व व्याकरण योग्य असावे.
५. दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक असावे.
६. यमक हे अंत्यपुर्वी स्वर यमक असावे.
७. ओढूनताणून यमक जुळवू नये.

*स्वर  यमक म्हणजे काय?*
*यमक*
ज्या शब्दांची सुरुवात वेगळ्या अक्षराने होते पण शेवट सारख्या अक्षरांनी होते त्याला म्हणतात यमक.
उदा. असते - नसते

*स्वरयमक*
  यमक जुळणाऱ्या शब्दांत उच्चार करताना सारखा स्वर येणे म्हणजेच *स्वरयमक* होय. 
उदा. फुलला - खुलला
वरील दोन्ही शब्द यमक जुळणारे आहेत. फुलला हा उच्चार करताना ला पूर्वी ल येतो. यामध्ये अ हा स्वर आहे. त्याचप्रमाणे खुलला यामध्ये पण उच्चार करताना अ हाच स्वर येतो. म्हणून खुलला आणि फुलला हे *स्वरयमक* आहेत.

कधीकधी आपण कविता लिहिताना यमक जुळवतो,पण प्रत्येक यमक हा *स्वरयमक* नसतो.
उदा. यमुनेतिरी - चातकापरी 
हे शब्द यमक आहेत पण *स्वरयमक* नाहीत.

मी इथे तुम्हाला  चाराक्षरी चे एक उदाहरण देते. त्यावरून प्रयत्न करून पाहा.

रम्य प्रातः
उगवली,
शुभ्र जाई
उमलली||१||

तिचा मंद 
हा सुवास,
करी धुंद
या मनास||२||

तिचा वर्ण 
शुभ्र सारा,
नभिचाच
शुक्र तारा||३||

तिचे देठ
हे कोवळे,
दिसतसे
गं वेगळे||४||

ती हसते
एकट्यात,
नि गर्दीत 
गजऱ्यात||५||

उमलते
कळीतून,
प्रगतीच्या
पेनातून||६||

ती फूलते 
झाडावर,
प्रगतीच्या 
पानावर||७||
-@प्रगती देशमुख(चंदुले).
    (शब्दसंगिनी)

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

विवीध काव्य नियम

Shalini Wagh:
*काव्यबत्तीशी हा काव्यप्रकार मोहरली समुह प्रमुख सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे यांचा स्वनिर्मित काव्यप्रकार आहे.*

*काव्यबत्तीशी नियमावली*

काव्य बत्तीशी प्रकारातील काव्य करीत असताना

१}

*पहिल्या ओळीत       नऊ(९)* 
*दुसऱ्या ओळीत       सात(७)*
*तिसऱ्या ओळीत      नऊ(९)*  
*चौथ्या ओळीत         सात(७)*
                *एकूण *बत्तीस वर्ण*
*म्हणजेच काव्य बत्तीशी....*

किंवा याच्या अगदी उलट म्हणजेच

*पहिल्या ओळीत       सात(७)* 
*दुसऱ्या ओळीत        नऊ(९)* 
*तिसऱ्या ओळीत       सात(७)*  
*चौथ्या ओळीत         नऊ(९)* 
                 *एकूण बत्तीस वर्ण*
*म्हणजेच काव्य बत्तीशी...*

अशा पद्धतीने वर्णाक्षरे यायला हवी.

*एकूण काय तर नऊ सात किंवा सात नऊ अशी चारोळीची मांडणी असायला हवी.....*

त्यामुळे काव्यातील पुढची गंमत तुमच्या लक्षात येईल........

२}
यमकांची जुळणी दुसऱ्या आणि चौथ्या ओळीतच व्हायला हवी...
यमक अत्यंत सुंदर आणि सटीक असावे......


वरील नियमाप्रमाणे चारोळी लिहिताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे.. ती, आशयपूर्ण भाषेचा उत्तम नमुना आणि परिपूर्ण काव्यानुभव देणारी असावी.

काव्यांजली काव्य प्रकार 
*♦️नियम*♦️

*१)*.  *चार ओळीचे एक कडवे असावे*

*२)*.  *पहिल्या ओळीत दोन शब्द*

*३)*.   *दुसऱ्या ओळीत तीन शब्द*

*४)*.   *तिसऱ्या ओळीत दोन शब्द*

*५)*.   *चौथ्या ओळीत एक शब्द*

*६)*.   *दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत शेवटचा शब्द यमक यायला हवा*

*७)*.  *रचनेत आशय, लय, ताल, व्याकरण योग्य असावे*

*८))*. *रचना ३,४, ५ कडव्यांची असावी*

*उदाहरणार्थ*


सडा प्राजक्ताचा
दारी खूप पडलेला 
सुगंध सांडलेला
मनातही...

दरवळ त्याचा
पसरला दाही दिशा
तरुण निशा
भारावली...

प्रभातवेळी फुलतो
प्राजक्त खुलून दिसतो
अंतरात भिनतो
दरवळ...

कोवळी पालवी
फुलांची नाजूक पाकळी
प्राजक्ताची कळी
फुलली...

सडा प्राजक्ताचा
मनात जपून ठेवला
अंगणी पसरलेला
सुगंध...

प्राजक्त मनातला
शब्दातून आज दरवळला
लेखणीतून उतरला
कागदावर...

*धनंजय देशमुख नांदेड*

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

*उपक्रम   उपक्रम    उपक्रम*

*शब्दरजनी साहित्य समूह*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम सुनीत काव्य*

*विषय:- नशीब*

*दिनांक:- ७/०३/२०२०*

*वेळ:- १०.०० ते ११ रात्रीपर्यंत*

🔴    *सुनीत काव्यप्रकार* 

*Sonnet* हा मूळ रशियन काव्यप्रकार. तो शेक्सपियरने इंग्रजी भाषेत आणला. हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचे, त्याचे *सुनीत* असे नामकरण करण्याचे आणि तो मराठी जनमानसात रुजविण्याचे काम रविकिरण मंडळातील कविंनी केले. माधव ज्युलियन, कवी बी. केशवशूत ह्यांची सुनीत काव्ये प्रसिद्ध आहेत.
त्याचे नियम पुढीलप्रमाणे.

🔴     *सुनीत काव्य नियम*

*१. हा काव्यप्रकार १४ ओळींचा आहे*
*२. चार चार ओळींची ३ कडवी आणि
अखेरीस दोन ओळी*
*३. पहिल्या दोन चरणांत पहिल्या आणि 
चौथ्या तर दुसऱ्या आणि तिसऱ्या
ओळींच्या अंती यमक*
*४. तिसर्‍या चरणात मात्र यमक पहिल्या
आणि तिसर्‍या ओळींच्या शेवटी आणिक दुसर्‍या आणि
चौथ्या ओळींच्या अंती यमक*
*५. अखेरच्या दोन ओळींमध्ये यमक
जुळले पाहिजे*
*६. पहिल्या तीन कडव्यात प्रश्न वा भावनातिरेक अपेक्षित* अखेरच्या दोन ओळी काव्याला कलाटणी देणार्‍या.
ह्याशिवाय विं. दा करंदीकर ह्यांनी सुनीत रचना अधिक प्रभावी व्हावी ह्याकरता *मुक्त सुनीत* रूढ केले. ह्यात ओळींची संख्या क्वचित तेरा अथवा पंधरा सुद्धा असते. ह्याचबरोबर यमक नियम सुद्धा शिथिल केलेले आहेत.

 🔴   *उदाहरणार्थ*

*सुनीत काव्य*

वाटते कधी नव्याने आयुष्य जगावे
पण मला का हा एकांत छळतो?
आठवणीने अंतःकरणात वणावा पेटतो
होरपळलेल्या ह्रदयात का वाटते मी मरावे?

जीवनाच्या या सुखदुःखाच्या मार्गात
आयुष्याच्या वाटेवरती का गाऊ विरहाचे गीत?
सख्या पुरल्या तुझ्या आठवणी मी जमीनीत
वाटते का अजूनही रमावे तुझ्याच स्पर्शात?

कळला नाही तुला कधीच मैत्रीचा अर्थ
का समजल्या नाही तुला माझ्या भावना?
आयुष्यभर खाल्लेल्या ठेचा गेल्या व्यर्थ
असह्य झाल्या प्रेमभंगाच्या यातना

एकदा पाहून बघ अंतर्मनाच्या आरशात
तुझेच प्रतिबिंब दिसेल माझ्या ह्रदयात

....सौ. अनिता आबनावे ©®

======================

*समूह संस्थापक*
*सौ. अनिता आबनावे*

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

*हायकू बद्दल थोडीशी माहिती:*

हायकू हा जपानी कवितेचा एक पारंपरिक प्रकार आहे ज्यामधे तीन लहान ओळींंतील कविता असते. हायकू कवितांच्या उत्पत्तीचा शोध नवव्या शतकात सापडतो.

हायकू हा फक्त कविताप्रकार नसून तो भौतिक जगाकडे पाहण्याचा आणि आपल्य अस्तित्वाकडे सखोलपणे पाहण्याचा एक मार्ग आहे. तो वाचकाच्या मनावर एक वेगळा आणि ठळक प्रभाव पाडतो.

शिरीष पै यांनी सन १९७५ मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.

शिरीष पै म्हणजे आचार्य अत्रे यांच्या कन्या. शिरीषताई म्हणायचे त्यांना सारे. 

हायकू मूळ जपानी काव्यप्रकार आहे. 
५,७,५ अशी *अक्षर संख्या असते यात. *(शब्द नव्हे)*
एकूण तीन ओळींची अर्थपूर्ण अल्पाक्षरी कविता म्हणजे थोडक्यात हायकू. 
कोणत्याही दोन ओळीत यमक असावे हा साधारण नियम आहे त्याचा. निसर्ग व मानवी मनाची सांगड, निसर्गातील एखादा क्षण टिपणे , ही वैशिष्ट्ये या प्रकारात येतात. 

काव्यप्रकार छोटा असला तरी अर्थ मोठा असतो. म्हणूनच दिसायला सोपा पण करायला अवघड असा हा प्रकार. 

*काही उदाहरणं:*

१.
झटकू कशी? (५)
कोळीष्टके मनात (७)
गुंतले त्यात (५)

२.
शिस्त लावली (५)
मी दुःखालाही नेक (७)
येती एकेक (५)

३.
टपटपत (५)
थेंबही पानांतून (७)
ओल आतून (५)

४.
भिंतीला कान (५)
कानात गोळा प्राण (७)
वाद अबोल (५)

५.
एक मनात (५)
दुसरेच जनात (७)
हेही जिणेच (५)

*(माहिती संग्रहित करून ठेवा.)*

*द्रोणकाव्य नियमावली*

*पहिल्या ओळीत ७ वर्ण*
*दुसऱ्या ओळीत ६ वर्ण*
*तिसऱ्या ओळीत ५ वर्ण*
*चवथ्या ओळीत ४ वर्ण*
*पाचव्या ओळीत ३ वर्ण*
*सहाव्या ओळीत २ वर्ण*
*सातव्या ओळीत १ वर्ण*

*अशी रचनेची मांडणी असते.*

*महत्त्वाचा नियम*

 *पहिल्या,तिसऱ्या, आणि पाचव्या ओळीत*
किंवा 
*दुसऱ्या, चवथ्या आणि सहाव्या ओळीत यमक जुळलेले असावे.*

 *उदा.*
*============================*
*शब्दांकन. धनंजय देशमुख*

*मना होई आनंद*
*परसबागेत*
*तो करवंद* 
*पसरला*
*सुगंध*
*नभी*
*या*

*सुगंधी नी मधाळ*
*थोडेसे आंबट* 
*अन् रसाळ*
*रंगवर्णी*
*ते लाल*
*दिसे* 
*ते*

*सुगंध हवाहवा* 
*वाटसरूस तो*
*वाटतो नवा* 
*कोणासही* 
*तो द्यावा*
*गोड*
*तो*
*============================*

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

निसर्ग

निसर्ग 
वसंत फुलतो 
हळूवार भाव दाटतो 
हृदयात प्रितीचा गाव दिसतो

निसर्ग 
पहिला पाऊस
आठवण मनी तुझी
विरहात डोळे ओली माझी

निसर्ग
शेतांमधला हिरवा
सुगीचा रानी गारवा
विहरतो गगन गाभारी पारवा

निसर्ग 
फुलाने बहरतो
वेलीने तो सजतो
रानं माळी शृंगाराने दिसतो

निसर्ग 
काळ्या ढगात
भासे पाण्याच्या पखाली
घरट्याकडे पक्षी जीव वरखाली

शाळा

शाळा
संस्काराचे मंदिर
केंद्र ते आत्मविकासाचे
मिळती धडे तेथे स्वयंशिस्तीचे

शाळा
मित्रांचे आगरं
ज्ञानाचा तो जागरं
गुरु ठायी अमृताचा सागरं

शाळा
समाजाचे श्रध्दास्थानं
मिळते सर्वांना मार्गदर्शनं
स्वयं अध्ययनात स्वावलंबी शिकवणं

शाळा
आनंददायी शिक्षणं
वाट भविष्याची सुकरं
देते राष्ट्राला नागरिक जबाबदारं

शाळा
आठवणींचा मेळा
सोडून जाता सर्वांचा
दाटून येतो विरहाचा गळा


सोमनाथ पुरी

काव्य शिरोमणी


काव्य शिरोमणी
******************************
      *काव्य शिरोमणी* हा पारंपरिक काव्य रचनेचा प्रकार नाही. त्यामूळे अधिक माहिती कुठेही उपलब्ध नाही. प्रामुख्याने समाजमाध्यमांवर लिहीला जाणारा काव्य प्रकार आहे. ह्यात कडव्यांच्या संख्येचे बंधन नसले तरी कविता सुरस व्हावी व मूल्यमापणासाठी किमान पाच कडव्यांची रचना असावी. उर्वरीत नियम खालील प्रमाणे.

*नियम*
*१) चार ओळींचे कडवे असावे.*
*२) पहिल्या ओळीत एकच शब्द असावा व तोच शब्द प्रत्येक कडव्यात प्रथम शब्द असावा.*
*३) दुसऱ्या ओळीत दोन, तिसऱ्या ओळीत तीन व चौथ्या ओळीत चार शब्द असावेत.*
*४) दुसऱ्या व चौथ्या किंवा तिसऱ्या व चौथ्या ओळीत यमक साधलेले असावे.*
*५) पहिला शब्द हा संबोध असावा/ संकल्पनात्मक त्या शब्दाबद्दलचा आशय प्रत्येक उलगडत जावा.*
*६) अक्षर संख्येचे कोणतेही बंधन नाही.*

*********************************

भावना
वात्सल्य सिंधू 
मातेची असे खास
ममतेची बालकास ती आस

भावना
प्रेमात प्रियसीची
जीवाला असतो ध्यास
विरहात जणू गळ्याला फास

भावना
क्रोधाची करते
विनाश हळव्या मनाचा
मार्ग असतो तो अधोगतीचा

भावना
लोभाची करते
जेंव्हा संपत्तीचा हव्यास
सुख समाधान जाते लयास

भावना
अहंकारी मनाची
अंधत्व ठरते विद्वानांची
होळी करते सर्व प्रस्थापितांची

*~सोमनाथ पुरी*


 

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

स्वचरित्र काव्य श्रुती पंडित

सोमनाथ जी 

सुविचार न चुकता येई 
विचारांची परिसीमा असते 
हिंदी मराठी चारोळ्याची 
रोजनिशी ज्योत पेटते 

विचाराचे भांडार तुमचे 
परिपक्वता आचरणात असते 
कौतुकाची थाप देणे तुमचे
मोजक्या शब्दांत मांडणे असते

कौशल्य तुमचे मानतो आम्ही
शब्दांच्या सामर्थ्यावर असते
शब्दांना अर्थासकट समजावणे 
तुम्हालाच ते जमत असते 

स्वभावाने थोडे कडक तरीही
मृदुभाषी  तुमचे धोरण 
सत्य आणि खरेपणा आवडी
निःसंकोचता न मनी धरी 

       मैत्रीण श्रुती