सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

तुझे बंध सैल झाले

तुझे रेशमाचे बंध आता सैल झाले
जेंव्हा माझ्या नभीचे उमाळे दाटले

नको आता सखे करु ते इशारे
तुझ्याही मनीचे धुके विरुन गेले

संपला तो पाऊस  नेहमीचेच उन्हाळे
माझ्या वेदनांचे साठे बहुत झाले

वेदना फुकाच्या आसतीलही माझ्या
आता माझ्या वेदनांना मीच कवळले

नेहमीचेच माझे माझ्या मनास बोलणे
त्यातही मी माझे, बहरणे हे पाहीले

@सोमनाथ पुरी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा