शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

ओळख विज्ञानाची

*स्पर्धेसाठीः-विषय ओळख विज्ञानाची*

रुजावे मूल्ये विज्ञानाचे
शोध असावा मानवतेचा
पुसून  कलंक अंधश्रध्देचा
वेध घ्यावा भविष्याचा

विज्ञान असे समाजमाध्यमांचे
नाते जपावे तंत्राच्या स्नेहाचे
असावे भान माणुसकीचे
शब्दांनी गीत गावे विज्ञानाचे

अस्तित्व घरोघरी विज्ञानाचे
आणि जागोजागी तंत्रज्ञाचे
रस्तोरस्ती गती दावे विज्ञान 
रुग्णालयात असते आरोग्याचे

नसावे विज्ञान संहाराचे
असावे पदर मानवी मूल्यांचे
अंतराळाचा शोध घेताना
हात व्हावेत शेतक-याचे

जीव, भौतिक,रसायनातही 
असतात प्रयोग विज्ञानाचे
तसेच भाषेत भाषाविज्ञानाचे
विज्ञान असते सामाजिकतेचे

सर्वव्यापी अस्तित्व विज्ञानाचे
मानले तर एक रुप ईश्वराचे
भजतो तो जीवन जगतो सुखाचे
कारण विज्ञान असते सर्वांचे

*सोमनाथ पुरी*





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा