ऐका मित्रांनो सत्य घटनेवर सांगतो एक कहाणी
भातुकलीच्या खेळा मधली राजा अन एक राणी
जेंव्हा या दुनियेला सोडून गेली राजाची ती राणी
मूले अन तो राजा झाला उघडा पोरक्यावाणी
राजा वदला लाड मूलांचे पूरवावे आता कोणी?
आज्ञा देताच राजासाठी दुसरी आली राणी
नंतर नव्हते लाड मूलांचे, राजाचीही उदासी
मूले म्हणाली पप्पा होती पहील्याच आईत खुशी
रागात आला राजा त्याने भडकावली गाली
तेंव्हा मूलांच्या डोळ्यांमध्ये दाटून आले पाणी
सांगा मित्रांनो खेळामध्ये मूले कुठे चुकली...?
खेळ खेळता राजाने का चीटींग करावी असली ?
#सोमनाथ_पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा