काटेरी वाटेवरती....!
काटेरी वाटेवरती, एकटीच मी जात होते ,
अनंत दुःखांना, उराशी कवटाळीत होते !
दूर क्षितीजावरती, नजर माझ्या ध्येयाची,
अनवानी पायाने, रस्ता मी चालत होते !
वाट आडवळनाची, आडवत होते कोणी,
माझ्याच वेदनांच्या, धुंदीत मी गात होते !
फुले उमलतील वाटेवरती, ती आस ह्या मनाची ,
आशेच्या लाटांवरती, निखा-यांना मी भोगत होते !
नयन चकाकले, सत्य शिवाच्या सुमनांनी ,
ओंजळीतल्या फुलांचा, सुगंध मी घेत होते...!
@सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा