दि. ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाची अनेक कारणे आहेत. पुरुषाप्रमाणे स्त्रियांमध्येही विवीध प्रकारचे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिबंध म्हणून पहिल्या टप्प्यात निदान आणि उपाय योजना झाल्यास कर्करोग पूर्ण बराही होतो. याचे अनेक उदाहरणे आपण पाहतो.
पुरुषांमध्ये कर्करोग होण्याचे महत्त्वाचे कारण पाहिले तर धूम्रपानाचे व्यसन आहे. सध्याच्या परिस्थितीत शालेय विद्यार्थीही ह्याला बळी पडत आहेत. त्याचे कारणे अनेक आहेत. शासनाला कर मिळतो म्हणून शासन याला संपूर्ण बंदी आणत नाही व वाढती बेरोजगारी पाहता आजचा तरुणही तंबाखू जन्य पदार्थाची सर्रास विक्री करतानाचे चित्र पाहवयास मिळते. ह्यावर संपूर्ण बंदी येणे गरजेचे आहे.
माझ्या सर्व मित्रांना कळकळीची विनंती आहे जर आपण धूम्रपान करत असाल तर ते वेळीच बंद करा अन्यथा कर्करोग आपल्या शरीराचा ताबा घेण्यास विलंब करणार नाही.
सर्व धूम्रपानग्रस्त मित्रांना समर्पित प्रस्तुत काव्य-
चंद क्षणाच्या चैनीसाठी, होऊ नको लाचार |
सोड गड्या नाद तिचा, हो आता तरी हुषार ||धृ||
भेेटली जरी जागोजागी घेण्या होऊ नको तयार |
विवीध रुपाने तोट्या पुड्यांत होईल ती साकार ||१||
निरोगी शरीरात तुझ्या ती निर्माण करील आजार |
कर्करोगाने ग्रस्त गात्र तुझे करील ती शिकार ||२||
देतील आग्रहाने चघळण्यास नको असे यार |
सुखी जीवनावर तुझ्या तु कर आता तरी प्यार ||३||
मौल्यवान जीवन तुझे कर व्यसनमुक्त आचार |
भिंती रंगवूनी जागोजागी करु नको शृंगार ||४||
मूलाबाळांवर प्रेम कर त्यांना करु नको निराधार |
माय बाप आणि पत्नीचा तुच एकमेव आधार ||५||
#सोमनाथ_पुरी