मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

चांदणे (कविता)

आज चांदणे रुसले
चंद्र नभी मावळला
जणू तरंग सागरात
अर्क भाव उतरला

तिथे बाकावर दोघे
रात्रांत जागलो संगे
रात्री पुनवेच्या होती
माझ्या आठवण संगे

छाया पाहतो ढगात
तुझी प्रतिमा हसरी
लुप्त अचानक होता
मनी आवस दुःखरी

मंद पहाटेचा वारा
स्पर्शतो सर्वांग सारे
स्पर्श तुझ्याविन करी
संथ लाटांचे किनारे

तेज स्मृतीत लख्खते
रंग आकाशाचे मनी
होता चंदेरी किनारे
रुप तुझेच स्मृतींनी

~सोमनाथ पुरी

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

22 सप्टेंबर दिनविशेष

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
☀☀☀💐 *सुप्रभात !* 💐☀☀☀
#########################
*२२ सप्टेंबर – दिनविशेष*

*अधिक आश्विन शके १९४२*
*अधिक आश्विन शुक्ल ६*
*नक्षत्र : अनुराधा*
*सूर्योदय : ०६ : २९* 🌄
*सूर्यास्त : १८ : ३४* 🌇
##########################

*२२ सप्टेंबर – घटना*

२२ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.
१६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
१८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
##########################
*२२ सप्टेंबर – जन्म*

२२ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१७९१: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७) १८२९: व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म. १८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म.
##########################
*२२ सप्टेंबर – मृत्यू*

२२ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन. १५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४६९) १८२८: झुलु सम्राट शक यांचे निधन.
१९५२: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो
############################
*सुविचार : चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.*
##########################
*📝संकलन : सोमनाथ पुरी*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कोरी पाटी (कविता )

कोरी पाटी

मातीत पेरुन रक्त
सर्वांना करी सशक्त
असा तो बाप सर्वांचा
कुनबी मात्र अशक्त

त्याले नाही हो पेंन्शन
नाही कसले वेतन
खपतो रानात स्वतः
मातीस करी चेतन 

माहित नसते त्याला
धर्माचे राजकारण
रिकाम टवळ्यांचे ते
कलगी तुरा भाषण

धडपड करतो तो
रानामधी पिकासाठी
पिक गेले तरी पुन्हा
पेरी सदा जगासाठी

प्रश्न अनेक त्याचेही
सतत असता पाठी
मसनात गेला तरी
कुटुंबाची कोरी पाटी

सोमनाथ पुरी



रविवार, २० सप्टेंबर, २०२०

१७ सप्टेंबर दिनविशेष

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
💐💐 *सुप्रभात !* 💐💐
दि. १७/०९/२०२०, गुरुवार
आश्विन शके १९४२, भाद्रपद कृ. १५
सूर्योदय : ०६ : २८
सूर्यास्त : १८ : ३९

*****************************
*मराठवाडा मुक्तिदिन*
*****************************
१७ सप्टेंबर – घटना

१७ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १६३०: बाेस्टन शहराची स्थापना झाली. १९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. १९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश. १९८३: वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.

१७ सप्टेंबर – जन्म

१७ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१८९१: दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०९)
१८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)

१७ सप्टेंबर – मृत्यू

१७ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१८७७: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८००)
१९३६: फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर याचं निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९५०) १९९४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचे निधन.
********************************
*सुविचार : प्रत्येक बाबतीत दुस-याचे अनुकरण करु नका स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा.*
*संकलन : सोमनाथ पुरी*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

१८ सप्टेंबर दिनविशेष

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
*सुप्रभात*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दिनविशेष*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*अधिक मासारंभ*
दि. १८ सप्टेंबर २०२०, शुक्रवार
आश्विन शके १९४२, अधिक आश्विन शु. १
सूर्योदय : 🌄 ०६ : २८
सूर्यास्त : 🌇 १८ : ३७
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८ सप्टेंबर – घटना

१८ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१५०२: शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचले.
१८१०: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. १८८२: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली. १८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केली.

१८ सप्टेंबर – जन्म

१८ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
५३: रोमन सम्राट ट्राजान यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११७)
१७०९: ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)
१९००: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)
१९०५: हॉलीवूड अभिनेत्री ग्रेटा यांचा जन्म.

१८ सप्टेंबर – मृत्यू

१८ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१७८३: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७०७)
१९९२: भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सुविचार : चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*संकलन : सोमनाथ पुरी*
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘


२० सप्टेंबर दिनविशेष

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
💐💐💐 *सुप्रभात !* 💐💐💐
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*२० सप्टेंबर – दिनविशेष*

*आश्विन शके १९४२,*
*अधिक आश्विन शु. ४, रविवार*
*विनायक चतुर्थी*
*सूर्योदय : ०६ : २८*
*सूर्यास्त : १८ : ३६*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*२० सप्टेंबर – घटना*

२० सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

*२० सप्टेंबर – जन्म*

२० सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०) १८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. 

*२० सप्टेंबर – मृत्यू*

२० सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.
१९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१) १९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.
१९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सुविचार : नकारात्मक विचार शत्रूपेक्षा जास्त इजा पोहचवतात.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*संकलन : सोमनाथ पुरी*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

परतीच्या वाटा....(कविता)

२१ सप्टेंबर दिनविशेष

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
☀☀☀ *सुप्रभात !* ☀☀☀
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
*२१ सप्टेंबर – दिनविशेष*
*शके १९४२*
*अधिक आश्विन शु. ५,सोमवार*
*सूर्योदय : ०६ : २८* 🌄
*सूर्यास्त : १८ : ३४* 🌇

|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
*जागतिक अल्झेमर्स दिन*

*आंतरराष्ट्रीय शांतता दिन*
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
*२१ सप्टेंबर – घटना*

२१ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१७९२: अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.
१९३४: प्रभातच्या दामलेंनी सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्रमंदिर या नावाने सुरू केले.
१९४२: दुसरे महायुद्ध

*२१ सप्टेंबर – जन्म*

२१ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१८६६: विज्ञान कथा इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९४६)
१८८२: भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९५३) १९०२: पेंग्विन बुक्स चे संस्थापक ऍलन लेन यांचा जन्म.

*२१ सप्टेंबर – मृत्यू*

२१ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१७४३: जयपूर संस्थानचे राजे सवाई जयसिंग यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)
१९८२: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन. (जन्म: २१ जून १९२३)
१९९२: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचे निधन. (जन्म: १० मे १९१४)
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
*सुविचार : विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत . ते प्रत्येक गोष्ट वेगळे पणाने करतात.*
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
*📝संकलन : सोमनाथ पुरी*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

दिनविशेष १९ सप्टेंबर

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
💐💐💐 *सुप्रभात !* 💐💐💐
*१९ सप्टेंबर – दिनविशेष*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आश्विन शके १९४२*
*अधिक आश्विन शु. २/३, शनिवार*
*मुस्लिम सफर मासारंभ*
*सूर्योदय : ०६ : २८* 🌄
*सूर्यास्त : १८ : ३६* 🌇
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*१९ सप्टेंबर – घटना*

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*१९ सप्टेंबर – जन्म*

१९ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१५५१: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)
१८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८) १९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*१९ सप्टेंबर – मृत्यू*

१९ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन. १७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन. १८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सुविचार : वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात मोठी संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा, जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*संकलन : सोमनाथ पुरी*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

अलवार चाहूल तुझी

🌹🌿🍁🌴🍁🌲🍁🌾🍁🌿🌹
*ललित लेख*
*अलवार चाहुल तुझी*
      आजची सकाळ जरा वेगळी भासली. पहाटे साडेपाचचा सुमार, बेसूमार धुके दाटलेले, वातावरण जणू गुलाबाचा गंध घेऊन धुंद होते. रानातील हिरवीगार पिकं आनंदात दवांनी नटली होती. झाडाच्या पानापानांतून दव निसटत जमिनीवर पडे व रामप्रहरी सडा टाकल्यागत भूईवर दवांच्या थेंबाचे अंथरुणच जनू टाकले कोणी असा भास होत होता.गवताची पाती भिजून चिंब झालेली. दोन दिवसाच्या गरमी नंतर आजची सकाळ गुलाबी वातावरणाने प्रसन्न भासत होती.
         सकाळचा फेरफटका मारण्यासाठी अशा रम्य वातावरणात आम्हीं निघालो. वातावरणच एवढे अल्हाददायक होते की, त्यात तुझी आठवण येणार नाही तर नवलच. तुझ्या चेह-यावरचे स्मित मला आठवले. नेहमी आनंदी दिसनारी तू , कुठे तरी आत खोलवर एका अनाकलनिय दुःखाचे सावट असेल असे कधी तुला पाहून वाटलेच नव्हते, पण सुखाला दुःखाचा शाप असतो. सुखे कधीच भरभरुन एकटी येत नसतात, तसेच तुझेही झालेले.
       चालता चालता हाच विचार मनात घोळत होता. निसर्ग हिरवागार आनंदी दिसतो. पण त्या मागे निसर्गाचेही दुःखाचे संचित असतेच. सर्व उन्हाळा अंगावर झेलतो. तापून तापून जमिनीत उष्णता खोलवर मूरते. मग मृगाचा पाऊस , तो मृदगंध सर्वांनाच हवाहवासा वाटतो. हिरवळीने नटलेली धरा आणि श्रावणातील बरसना-या धारा.. .. असुसलेला वारा...हे सर्व वातावरण आपल्याला एका अलौकिक दुनियेत घेऊन जाते. ज्यांच्या जवळ त्यांच्या प्रिय व्यक्ती असते, ते निसर्गाचा मन मुराद आनंद घेतात व ज्यांच्या पासून कोणी प्रिय व्यक्ती दुरावलेली असते, ते भूतकाळातील आठवणीत रमतात.
       अशीच मला तुझी आठवण आली आणि पहिला प्रेमाचा ऋतू आठवला. जीवनभर पुरुन उरेल असे ह्या जगात काहीच नसते, पण माणूस सुखाच्या मागे धावत असतो. जसे हरीन नाभीतील कस्तुरीच्या सुगंधाने उर फुटे पर्यंत धावते.....पण त्याच्या जवळ असलेल्या कस्तुरीची त्याला जानीव नसते. 
               माणसाचेही तसेच आहे ना.... सुखाच्या मागे आयुष्यभर धाव...धाव धावत असतो, पण सुखी कधीच होत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत चेहऱ्यावर दुःख, आणि काही तरी मिळवलं नाही ह्याची खंत. मृत्यूनंतरही कपाळावरील आट्या त्याच्या अपूर्णतेचे निदर्शन करतात....पण ते पूर्ण सत्य नाही. सुख हे कस्तुरी प्रमाणे आपल्याच मनात असते. फक्त गरज असते दृष्टिकोन बदलण्याची..........!!

 ~ *सोमनाथ पुरी*
🌹🌿🍁🌿🌺🌴🌺🌲🌺🌿🌹

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

गजरा

*****************
*गजरा*
*****************
*आहे तुझा मनी ताजा*
*गजरा आठवणींचा*
*फुल एकेक माळीले*
*दरवळ रोज त्याचा*

*सुख दुःखाचे क्षणही*
*प्रेम धाग्यात गुंफिले*
*माझ्या कवितेत आज*
*तुझे चित्रही रंगले*

*चाफा प्राजक्ताचे येणे*
*झाले सहज अंगणी*
*बाग फुलांचीही आता*
*बहरली ती शब्दांनी*

*दुराव्याचे ही अंतर*
*मोती अक्षरात झाले*
*नसशिल ह्या क्षणाला*
*तुझे बोलणे स्मरले*

*बाग रोज फुलवितो*
*आठवणींच्या फुलांनी*
*सांजवेळी ते पहातो*
*चित्र दुरुन डोळ्यांनी*

******************
*सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
*****************






गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

आई

आई होती साधी भोळी
जशी कोंदनाची पोळी

मनी सदा देव भक्ती
आम्हां भावंडाची शक्ती

घरकाम सर्व राडा
हाके संसाराचा गाडा

जीव लावी लेकराला
जशी गाय वासराला

एक क्षण असा आला
श्वास शेवटाचा गेला

- सोमनाथ पुरी