मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

जिजाऊ जयंती

****************************
कर्तृत्ववान महिला
****************************
वंदुनिया जिजाऊला 
गातो गीत स्त्री वीरांचे
स्थापिन्यास स्वराज्याला
बलिदान शिवबाचे

आधुनिक नारीस ते
ज्ञान ऋण सावित्रीचे
सहनशिलता अंगी
दिले धडे शिक्षणाचे

राणी झाशीची लढली
छाप गो-यांवर तिची
झुंज एकाकी शत्रूस
दिली तिनेही शौर्याची

पति निवर्तल्या मागे
देवी अहिल्येचे धैर्य
सांभाळीले राजपाठ
होते नियतीचे क्रौर्य

ताराबाई शिंदे होत्या
पुरस्कर्त्या समतेच्या
मोह सोडून संसारी
झाल्या कैवारी स्त्रियांच्या 
***************************
@Somnath puri
***************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा