मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

जिजाऊ जयंती

****************************
कर्तृत्ववान महिला
****************************
वंदुनिया जिजाऊला 
गातो गीत स्त्री वीरांचे
स्थापिन्यास स्वराज्याला
बलिदान शिवबाचे

आधुनिक नारीस ते
ज्ञान ऋण सावित्रीचे
सहनशिलता अंगी
दिले धडे शिक्षणाचे

राणी झाशीची लढली
छाप गो-यांवर तिची
झुंज एकाकी शत्रूस
दिली तिनेही शौर्याची

पति निवर्तल्या मागे
देवी अहिल्येचे धैर्य
सांभाळीले राजपाठ
होते नियतीचे क्रौर्य

ताराबाई शिंदे होत्या
पुरस्कर्त्या समतेच्या
मोह सोडून संसारी
झाल्या कैवारी स्त्रियांच्या 
***************************
@Somnath puri
***************************

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

आद्य शिक्षिका

*स्पर्धेसाठी*
*********************
*अनुबंध साहित्य समूह आयोजित*
*अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा*
*विषय : आद्य महिला शिक्षिका*
*********************
चुल आणि मूल हेच
होते प्राक्तन स्त्रियांचे 
पशू पेक्षाही उपेक्षा
सार ते तिच्या जन्मीचे

मुक्त श्वास शिक्षणाने
दिला तो सर्व मुलींना 
करू प्रथम वंदन
ज्योतिबांच्या सावित्रींना

रोश समाजाचा घेत
आद्य स्त्री शिक्षिका झाली
स्वतः शिकून स्त्रियांना
ज्ञान गंगा खुली केली

कधी ना डगमगली
कधी ना हार मानली
तिच्या परिश्रमानेच
उंची स्त्रियांनी गाठली

मुक्त झाल्या दिशा दाही
सावित्रीच्या त्या श्रमाने
बळ मिळाले स्त्रियांना 
सावित्रीच्या शिक्षणाने
*********************
*- सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
*********************

शनिवार, २ जानेवारी, २०२१

सांज

सांज*

सांज ही धुंद सावळी
तेज लाली मित्राचळी
भारावले अंबर हे
जणू कुंकूम आभाळी

दूर मंदिरी कलश
त्याचे चकाकते तेज
लाल किरणांचा मारा
त्याची शिखरी ती सेज

जणू तो कलशावरी
गोळा सूर्य लालेलाल
शोभे मुकूटमणी तो
ढगांचाही आहे ताल

सुगी भरात ती रानी
झाले निःशब्द हे वृक्ष 
माथ्यावरी डोंगराच्या
देती ढगही ते साक्ष

धावे पांदीवरुन ती
जोडी सरजा राजाची
गाडी घेऊन घंट्याचा
नाद करी घुंगुराची

मंदिराच्या ही पल्याडं
आहे नदी शांत क्लांतं
तिच्या किनारी ते गावं
उभे मोठ्या दिमाकातं
------------------------------------
*- सोमनाथ पुरी*