शनिवार, १९ जून, २०२१

माझा वाढदिवस

[6/20, 12:01 AM] Pandit Shruti: वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा सोमनाथसर 
🎂🍩🍔🍕🍧🥞🍨🍫🍬🌭🌮🌹💐

आगळे वेगळे व्यक्तिमहत्व 
वेगळेच तुमचे असणे 
काय वर्णू काय लिहू 
तुमचा वेगळेपणा जाणवे 

अबोल स्वभावाचे गुपित 
कोणाला ही कळले नाही 
राग येता नाकावरी तुमच्या
गप्प होई सगळेजण ही 

साहित्याची आवड जोपासता 
चारोळीत पूर्ण अर्थ सांगतात
भावपूर्ण रचना तुमच्या 
मनाला स्पर्शून जातात 

*अंतरध्वनी* मनातल्या 
तुमच्या हदयाचा ठाव घेतात
तुम्हाला आणि  लेखणीला 
सगळेजण मनाचा मुजरा करतात 

आरोग्य तुमचे चांगले राहो 
हीच स्वामी चरणी प्रार्थना 
अंतरध्वनीचा नाद घुमू दे 
अशीच आमची याचना 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

       ** श्रुती **
[6/20, 12:03 AM] Navghare sandip: ꧁ #𝑯𝒂𝒑𝒑𝒚_𝑩𝒊𝒓𝒕𝒉𝒅𝒂𝒚꧂
        🌺🌺🌲🌺🌺
श्री. सोमनाथ पुरी सर, यांचेशी झालेली मैत्री म्हणजे,
माझी मैत्री मराठी व्याकरण जाणत्याशी झाली असे मी म्हणेन.
पेशाने सेवाभावी शिक्षक, मृदुभाषी आणि दूरदृष्टी ठेवून
कार्य करणारे सोमनाथ सर.साहित्य संगम परीवार, जडणघडणीत सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर ते श्रेय सोमनाथ पुरी सरांना जातं.मी ,मराठी कविता त्यांचे नियम याचा अभ्यास फारसा नसतांना देखील,हा साहित्य समुह तयार करण्याचे धाडस केले.त्या धाडसाला पाठबळ मिळाले ते सरांचे. स्वतः त्यांचा साहित्य समुह असुनसुद्धा; संगम समुहाचे पालकत्व त्यांनी स्विकारले, याबद्दल त्यांचा मी सदैव ऋणी राहील.
सर आपण नेहमी आनंदी रहावे,आपला परिवार सदैव सुखी राहावा हीच सदिच्छा 🙏
🌱🌹🌻🌹🌱🌻🌹🌱🌻
*हात धरुन शिकविले आपण*
*साहित्य लिहायचे गुण..*
*प्रत्यक्ष भेट नाही परंतु,*
*दिली संजीवनी आणून..*

*मौल्यवान वेळ दिला*
*आणखी काय पाहिजे..*
*आपल्या दोघांच्या नात्यात*
*फक्त शब्द नाचला पाहिजे..*

*आपण होता पाठीशी* 
*जसा कृष्ण होता जवळ..*
*अनेक बाबतीत दिली मला*
*गीते सारखी  वचनं प्रबळ..*

*तुमच्या सारखा मित्रं लाभला*
*हा नशिबाचा भाग आहे..*
*शब्दांनी जुळलेली मनं आपली*
*हा सुंदर योगायोग आहे..*

काही ओळी सर तुमच्या करीता, मनापासुन शुभेच्छा 🙏

🌻🔲🌻🔲🌻🔲🌻🔲🌻🔲🌻
!! ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा !!
🄷🄰🄿🄿🅈 🄱🄸🅁🅃🄷🄳🄰🅈
         ꜰʀᴏᴍ:- 
 ꜱᴀɴᴅɪᴩ ɴᴀᴏɢʜᴀʀᴇ
 _________________________
[6/20, 9:03 AM] Klyani Anuradha: *सो*..सोशिक तरीही,
          कणखर व्यक्तीमत्व
*म*.. मनानंही निर्मळ,
          असं प्रेमळ,
           व्यक्तीमत्व,
*ना*..नाही गर्व,
          नाही ताठा,
         समंजस व्यक्तीमत्व,
*थ*...थकणार नाही,
           हरणार नाही,
         असं धडाडीचं,
          व्यक्तीमत्व,
*अनुराधा कल्याणी.*✍️
शिक्षकी पेशाची शिस्त, आणि ज्ञानाचं भांडार खुल्या मनानं आणि मुक्त हस्तानं देऊन विद्यार्थी घडवणारे आदर्श शिक्षक *सोमनाथ सर*.. 
साहित्य संगम गृपमध्ये तुमचं असणं म्हणजे शिस्त आणि संयम कसा असावा याची शिकवणच.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎂💐

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

गोदतीर्थ उपक्रम 3

*या अथवा अशा सर्वच वृत्ताना हाताळण्यासाठी आवर्तनात कोणते शब्द लागतात / आवश्यक असतात हे आधी बघायला हवे. आवर्तने आणि त्यांना अनुसरून शब्द यांची काही उदाहरणे देत आहोत*
१) गालगागा - काय झाले , मी म्हणालो , काढताना
२) गागालगा - काहीतरी , आता नको , काढायला
३) गालगा - पारवा , आरसा , नेहमी , काढणे
४) लगागा - हवासा ,नको रे , इशारा , किनारा
५) लगागागा - कुणासाठी , नको आता , किनाऱ्याला
६) लगालगा - कितीतरी , हवेतले , घरातली , करायला
७) गालगाल - आजकाल , हातपाय , काढणार
-----------------------
८) गागाल - आतून , व्यापार , आधार , काढून
९) ललगा - हलके , हसते , बसली , असणे
१०) गालल - आदर , बाधक , व्यापक , काढत 
११) गाल - नाक , कान , आज , मौन , काढ
१२) लगा - नशा , हवा , नको , गळा
१३) ललल - सरळ , गरम , हसत , जहर 
१४) लल - जर, तर , पण , वर
१५) गा - मी , तू , हे , ती , का


*ही वर दिलेली आवर्तने वापरून तयार झालेली काही वृत्ते तुम्हाला उदाहरणासाठी देत आहोत*

*१) गालगागा गालगागा गालगागा गालगागा - कालगंगा वृत्त*
*२)गालगा गालगा गालगा गालगा - स्त्रग्विणी*
*३)गागालगा लगागा, गागालगा लगागा- आनंदकंद वृत्त*
*इत्यादी*

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

पोवाडा

🚩🔶🚩🔶🚩🔶🚩🔶🚩🔶🚩

*शब्दरजनी साहित्य समूह*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम पोवाडा काव्य लेखन*

*सराव कार्यशाळा* ( दोन दिवस सराव उपक्रम )

*विषय :- छत्रपती शिवाजी महाराज*

*दिनांक :- १७/०२/२०२१ - १८/०२/२०२१*

*माहिती--पोवाडा*

*    पूर्वी राजांच्या पदरी त्यांची स्तुती करणारे  राजकवी किंवा भाट असत;पण ते राजदरबारात.

*    शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा प्रजेमधे आपला राजा, आपले राज्य ही भावना निर्माण व्हावी म्हणून राजाच्या शौर्याचे,राजाचे गुणवर्णन करणारे भाट (शाहीर) गावोगावी जाऊन राजाने किंवा सरदाराने एखादी मोहीम फत्ते केली की त्याचे वर्णन करू लागले.
(हे तेव्हाचे प्रसिद्धी अधिकारी)

*    ह्या गुणांच्या, प्रसंगाच्या काव्यात्मक वर्णनाला पोवाडा म्हणतात व रचणाऱ्याला, गाणाऱ्याला शाहीर म्हणतात.

*    वास्तविक पोवाडे हे पद्यात्मक गद्यच आहे. फक्त गद्यातल्या प्रत्येक ओळीला यमकात बसवले की झाला पोवाडा तयार.

*    म्हणून पोवाडा रचायला एकदम सोप्पा काव्यप्रकार.

*    जसे गद्यामधे एका मुद्याचा एक परिच्छेद असतो आणि तो कितीही ओळींचा असू शकतो तसेच पोवाड्यामधे एका मुद्याचा एक चौक असतो,तो कितीही ओळींचा असू शकतो.
(समजा पहिला चौक पाच ओळींचा तर दुसरा चौक आठ ओळींचा तर तिसरा चौक चारच ओळींचा असू शकतील)

*    प्रत्येक चौकाचे यमक वेगळे असलेले चालते.

*    एक चौक झाला की पालूपद म्हणायचे(जी -जी-रं-जी) 

*    पोवाडा म्हणजे फक्त कविता नाही तर ते नाटकही असतं. शाहीर पोवाडा गाताना अभिनय, आवाजात चढउतार करतो त्यामुळे तो अधिक प्रभावी होतो.
पोवाडा गाताना मधेच सरळ वाक्य बोलले तरी चालते.

*    पोवाडा गाताना डफ आणि तुणतुणे ही वजनाला हलकी व हाताळायला सोपी अशी दोन वाद्ये वाजवतात. तसेच शाहिराची री ओढायला कोरस असतो.

*    वरील नियम सिद्ध करणारी उदा. देते.

1)  नाव त्याचं अफजलखान
      जिता जागता हो सैतान
      तो बोलला छाती ठोकून
      शिवाजीला टिकतो चिरडून

2)  विजापूरचा अफजलखान
      शिवाजीला करण्या हैराण
      किंवा त्याचा घ्यावया प्राण
      पैजेचा विडा उचलून
      आला प्रतापगडावर जाण
      पण अफजलखानाला शिवाजीराजानं
       कायमचा बशिवला कबर बांधून
     जी जी जी जी

*    या दोन्ही चौकात वर्णन एकच आहे; पण पहिल्या चौकात चार ओळी मग पालुपद; तर दुसऱ्या चौकात सात ओळी मग पालुपद आहे.

*    कुठच्याही ओळीत मात्रा किंवा अक्षरसंख्या सारखी नाही.

*    एकच ओळ आपण परत परत लिहू शकतो. उदा.
 संताजी धनाजी यांची घडली खरी कहाणी
 नाव ऐकता वैऱ्याचे घोडे नव्हते पित पाणी
 असे झालेच नाही कुणी,असे होणार नाही कुणी
 जगी झालेच नाही कुणी, जगी होणार नाही कुणी.
  शेवटच्या दोन ओळी परत परत आल्या आहेत.

*    तेव्हा माईक नव्हते शाहिराला त्यामुळे व विरश्रीयुक्त बोलायचे म्हणून मोठ्याने गायला लागायचे,त्याला दम खाता यावा म्हणून कोरस असतो तसेच गद्यही असते. 
उदा.कल्याणच्या खजिन्यात
       लुटीस एक मान
        लाभली रूपाची खाण
        सूभेदाराची तरूण सून
         (आता गद्य)
मोगलांनी आपली धनदौलत लुटली,
आया बहिणींची अब्रू लुटली;पण शिवाजीराजे तसे नव्हते,परस्त्रीला ते मातेसमान मानणारे होते.
          (परत पोवाडा सुरू)
         पण तिच्या पूढे नमुनी मान
         मानुनी तिला माते समान
        असा राजा चारित्र्यवान
         जी जी जी रंं जी

*    पोवाडे सर्वसामान्यांसाठी असल्याने त्यात भाषा सौंदर्य, अलंकार काही नसते.उलट सर्वसामान्य भाषा वापरायची.

*    आता तुम्ही पोवाडा कसा रचाल? 
शिवाजीमहाराजांच्या जीवनातील कोणताही एक प्रसंग घ्यायचा. तो प्रसंग गद्यामधे लिहायचा. मग प्रत्येक ओळीत यमक येईल अशी शब्दरचना करायची.



*    अगदी एक चौक लिहिला तरी चालेल. जास्तीत जास्त चारच चौक लिहा.

*    उदा.
प्रथम गद्यात परिच्छेद लिहिला.
(हा समुहात पाठवायचा नाही)

*    औरंगजेबाने मोठा फौजफाटा घेऊन शाहिस्तेखानाला दक्षिणेकडे शिवाजी महाराजांना नष्ट करण्यासाठी पाठवले एके रात्री शिवाजी महाराजांनी हल्ला त्याच्यावर केला,त्यात शाहिस्तेखानाची बोटं कापली गेली.शाहिस्तेखान पळाला.
ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकली आहे.

*   याचे चार चौक करता येतील.

1)  त्याच्या फौजफाट्याचे वर्णन

2)  शाहिस्तेखानाचे वर्णन

3)  घटनेचे वर्णन

4). राजाचा पराक्रम

            पोवाडा

शाहिस्तेखानाचा फौजफाटा प्रचंड कसा तो पहा.

    त्याचं घोडदळ, पायदळ
    फौजफाटा लई बक्कळ 
    जित्या हत्तीचं बळ
    पहाणारा कापतो चळचळ
    जी जी जी जी

हा शाहिस्तेखान म्हणजे औरंगजेबाचा मामा,मोठा कपटी आणि पराक्रमी.

     नाव त्याचं शाहिस्तेखान
     जिता जागता जणू सैतान
     तो बोलला छाती ठोकून
     शिवाजीला टाकतो चिरडून

भली मोठी फौज घेऊन शाहिस्तेखान दक्षिणेच्या दिशेने निघाला.

    मग दिल्लीहून तडफेन
    40हजार फौज घेऊन
    आला मामा शाहिस्तेखान
    पुण्यामधे कडक शिस्तीनं
    बसला तळ ठोकून
     जी जी जी जी

शिवाजी महाराजांकडे एवढा फौज फाटा नव्हता.त्यांनी बेसावध शाहिस्तेखानावर एके रात्रीचा हल्ला केला.

    पण त्याला शिवाजी राजानं
    अचानक रात्री गाठून
    घेतली बोटं कापून
    जीवावरील संकट बोटावर भागून
    शाहिस्तेखान पळाला पुणे सोडून
    जी जी जी जी

*    तुम्हाला शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका घटनेवर पोवाडा रचून समुहात दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे.

*    प्रत्येकीने प्रयत्न करून पहायचा. या सारखं सोप काहीच नाही.

*    कमीतकमी एक चौक,जास्तीत जास्त चार चौक पाठवू शकता.

*    काही तरी नवीन करतो तेव्हा आपल्याला वेगळाच आनंद मिळतो. तो आनंद मिळवा.

*महत्त्वाची टिप:- सराव कार्यशाळा उपक्रमाचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही*

========================

*कवयित्री नंदीनी सुकाळे*
*कवी मयूर पालकर*
*कवयित्री श्वेता उदमले*
*समूह आयोजिका*

*कवयित्री अनिता आबनावे*
*समूह संस्थापक*

*शब्दरजनी साहित्य समूह*
*समस्त साहित्यिक परीवार*

🚩🔶🚩🔶🚩🔶🚩🔶🚩🔶🚩

मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

जिजाऊ जयंती

****************************
कर्तृत्ववान महिला
****************************
वंदुनिया जिजाऊला 
गातो गीत स्त्री वीरांचे
स्थापिन्यास स्वराज्याला
बलिदान शिवबाचे

आधुनिक नारीस ते
ज्ञान ऋण सावित्रीचे
सहनशिलता अंगी
दिले धडे शिक्षणाचे

राणी झाशीची लढली
छाप गो-यांवर तिची
झुंज एकाकी शत्रूस
दिली तिनेही शौर्याची

पति निवर्तल्या मागे
देवी अहिल्येचे धैर्य
सांभाळीले राजपाठ
होते नियतीचे क्रौर्य

ताराबाई शिंदे होत्या
पुरस्कर्त्या समतेच्या
मोह सोडून संसारी
झाल्या कैवारी स्त्रियांच्या 
***************************
@Somnath puri
***************************

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

आद्य शिक्षिका

*स्पर्धेसाठी*
*********************
*अनुबंध साहित्य समूह आयोजित*
*अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा*
*विषय : आद्य महिला शिक्षिका*
*********************
चुल आणि मूल हेच
होते प्राक्तन स्त्रियांचे 
पशू पेक्षाही उपेक्षा
सार ते तिच्या जन्मीचे

मुक्त श्वास शिक्षणाने
दिला तो सर्व मुलींना 
करू प्रथम वंदन
ज्योतिबांच्या सावित्रींना

रोश समाजाचा घेत
आद्य स्त्री शिक्षिका झाली
स्वतः शिकून स्त्रियांना
ज्ञान गंगा खुली केली

कधी ना डगमगली
कधी ना हार मानली
तिच्या परिश्रमानेच
उंची स्त्रियांनी गाठली

मुक्त झाल्या दिशा दाही
सावित्रीच्या त्या श्रमाने
बळ मिळाले स्त्रियांना 
सावित्रीच्या शिक्षणाने
*********************
*- सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
*********************

शनिवार, २ जानेवारी, २०२१

सांज

सांज*

सांज ही धुंद सावळी
तेज लाली मित्राचळी
भारावले अंबर हे
जणू कुंकूम आभाळी

दूर मंदिरी कलश
त्याचे चकाकते तेज
लाल किरणांचा मारा
त्याची शिखरी ती सेज

जणू तो कलशावरी
गोळा सूर्य लालेलाल
शोभे मुकूटमणी तो
ढगांचाही आहे ताल

सुगी भरात ती रानी
झाले निःशब्द हे वृक्ष 
माथ्यावरी डोंगराच्या
देती ढगही ते साक्ष

धावे पांदीवरुन ती
जोडी सरजा राजाची
गाडी घेऊन घंट्याचा
नाद करी घुंगुराची

मंदिराच्या ही पल्याडं
आहे नदी शांत क्लांतं
तिच्या किनारी ते गावं
उभे मोठ्या दिमाकातं
------------------------------------
*- सोमनाथ पुरी*