#चाफा
सोन चाफा तुझ्या मनीचा,
मला कधी कळलाच नाही.
जपली प्रतिमा हृदयात तरी,
तो भाव शब्दात वळलाच नाही.
पेरित गेलीस एकेक शब्द,
गंध तो चंदनाहून उणा नाही.
आशेने पहात होतीस, तो
प्राजक्त कधी फुललाच नाही.
होती तगमग माझ्याही जीवाची,
पण ठाव त्याचा लागलाच नाही.
वसंत बहरला, फुलेही उमलली,
मधूमास तयाचा चाखलाच नाही.
होते काटे पथात ईहलोकीचे,
म्हणून कल्पनेत रमलोच नाही.
मूक्त आंगण मायबोलीचे,
खेळ शब्दांचा जुळलाच नाही.
मलाही वाटे प्राजक्तासम फुलावे,
ज्याचा अंत कधी होणार नाही.
येतील अतुर ऋतुचे अढळ चांदणे,
क्षण तयाचे निष्प्रभ ठरणार नाही.
#सोमनाथ_पुरी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा