बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

कोरा कागद

कृष्ण सखा

बाप्पा काय म्हणतील

छळनारी नजर

प्रेम

ओल


संताचे बोल

*स्पर्धेसाठी*

*संताचे बोल*

अंध श्रध्दा नको
संतांनी बोलीले
ढोंगीच जाहले
वर्तमानी

गावांची स्वच्छता
गाडगे बाबांची
हौस ती फोटोंची
आज झाली

सावत्याचे बोलं
ईश्वरं कर्मातं
घ्यावे हे ध्यानातं
जनलोकी

जाती भेद नको
नको तो विटाळं
सर्वांहाती टाळं
भक्तीमार्गी

नाते निसर्गाशी
जपावे सर्वांनी
बोलीले तुक्यांनी
अभंगातं

*सोमनाथ रामराव पुरी*
कुरुंदा, ता. वसमत जि. हिंगोली
पोस्ट पिन - 431512
मो.क्र. 9665989838
purisomnath555@gmail.com

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

त्रिवेणी

*त्रिवेणी* हा काव्यप्रकार भारतात सर्वप्रथम कवी गुलजार यांनी हिन्दी भाषेत विकसित केला. 
मराठीत याचे प्रचलन कोणी केले याबद्दल काही निश्चित माहीती उपलब्ध नाही. 
इथे त्रिवेणाच्या नियमांत थोडी सुधारणा करून या काव्यप्रकाराला अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. 

*त्रिवेणी रचनेचे नियमः-*

१) त्रिवेणी नावाप्रमाणेच तीन ओळींची साधीसुदी रचना असते. याला विषयाचे बंधन नसते.

२) पहिल्या दोन ओळीत एक विचार मांडला जातो आणि तिसरी ओळ कधी पहिल्या दोन     ओळींच्या अर्थामध्ये भर घालते तर कधी त्यांना वेगळा दृष्टीकोन देते.

३) ही रचना तीन ओळीत मर्यादीत होत असली तरी यात हायकू प्रमाणे प्रत्येक ओळीत अक्षरांची ठराविक मर्यादा नसते. तर पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत अक्षरांऐवजी शब्दांची संख्या सारखी असते आणि दुसऱ्या ओळीत रचना लयबद्ध आणि अर्थ पूर्ण होईल इतकेच शब्द असतात.

या रचनेला त्रिवेणी नाव दिले गेले कारण इलाहाबादच्या त्रिवेणी संगमाप्रमाणेच इथेही तीन ओळींचा संगम होतो. तिथे संगमावर गंगा आणि जमुना आपल्याला स्पष्ट दिसतात पण तक्षशिले कडून वाहत येणारी सरस्वती संगमावर आल्यावर दोघांच्या प्रवाहात बेमालूम मिसळते, तिथे तिचे वेगळे अस्तित्व दिसत नाही. सरस्वती प्रमाणेच त्रिवेणीची तिसरी ओळही या रचनेला पूर्णत्व देते. तिसरी ओळ स्वतंत्र असली तरी ती पहिल्या दोन ओळीत बेमालूम मिसळते. अर्थात पहिल्या दोन ओळीतील गुढ तिसऱ्या ओळीत उमगते. 


*उदा:*

१.
आसमंत गिळंकृत करणारी शांतता पुन्हा नव्यानं फसली;
गर्द तिमीरातूनी एक शलाका अविरत तेवती दिसली. 

वाकलेल्या सुईनं झाकलेलं नातं सांधत होतं कुणीतरी. 

२.
पडत्याला सावरून घेण्याचा झाला उगा कांगावा, 
सुधारणा दाखवण्याचा क्रम स्वतःच कितीदा सांगावा. 

असो,
खोडरबराला बोलता कुठं येतं अजून!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

अर्चना


|| अर्चना ||

वक्रतुंड गौरीसुत
श्रीगणेश लंबोदर
रुप तुझे रे मोहक
शोभे ते उंदीरावर

ढोल ताशांचा गजरं
तुझे येणे उल्हासितं
नेत्र ही पाहून पावकं
बाल थोरं आनंदीतं

मोदकांचा ही प्रसादं
तुला भावे सदोदितं
मूर्ती ही अति सुंदरं
जागोजागी विराजितं

महामारी संकटातं
तुच तारणहार रे
करी भक्त अर्चना ही
दाव तू अवतार रे

गजमुख गजाननं
भावे करीतो आरती 
दिसो अशीच नेहमी
तुझी ही प्रसन्न मूर्ती 

- सोमनाथ पुरी

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

वृत्त

वृत्त

गद्यात एकामागोमाग एक चरण म्हणजेच ओळी येतात.

पद्यात ओवी किंवा चरण असते.

पद्य रचनेत लय असते या लयबद्ध शब्द रचनेला वाक्य म्हणतात पद्याच्या वाक्यात ही जी विशिष्ट शब्दबद्ध रचना असते तिलाच वृत्त किंवा छंद म्हणतात.

वृत्त आणि चंदा चे काही नियम

१) वृत्तात अक्षरसंख्या ठरलेली असते.
२) चरणातील रस्व व दीर्घ हा अक्षर क्रम ठरलेला असतो.
३) रस्व अक्षरांना लघु म्हणतात.
४) रस व अक्षर  u अशा   चिन्हांनी दर्शवितात.
५) दीर्घ अक्षरांना गुरू अक्षर म्हणतात.
६) गुरु अक्षर अशा  - चिन्हांनी दाखवतात.
७) गण म्हणजे गट चरणातील तीन-तीन अक्षरांचा मिळून गण तयार होतो.

यती----
पद्धत चरण वाचताना वाचकाला जिथे थांबावे लागते  ते विश्रांती स्थान म्हणजे यती.

कवितेचे चरण वाचताना वाचक जिथे मध्ये थांबतो त्याला मध्यस्ती असे म्हणतात.

जेव्हा वाचक कवितेच्या आचरणाच्या शेवटी थांबतो त्याला अंत्यस्ती असे म्हणतात.

यती भंग
कवितेचे चरण वाचताना वाचक जेव्हा एखादा शब्द तोडून वाचतो त्याला यती भंग असे म्हणतात.

उदाहरण
प्रिय अमुचा एक महा-राष्ट्र
 देश हा
हे काव्य चरण वाचत असताना गायक किंवा वाचत महाराष्ट्र म्हणतांना  मधेच थांबतो यालाच येती गंगा म्हणतात.

-हस्व स्वर ( लघु )
अ, इ, उ,ऋ लृ 

दिर्घ स्वर ( गुरू)  
आ ई ऊ ए ऐ ओ औ 

व्यंजन-
-हस्व ( लघु )  
क कि कु 
दिर्घ ( गुरू)  
का की के कै को कौ कं क:

-हस्व ( लघु )   अक्षर दिर्घ केंव्हा होते.

जर लघु अक्षराच्या पुढे जोडाक्षर आले. व त्या जोडाक्षराचा आघात आधिच्या अक्षरावर येत असेल तर अश्यावेळी ते लघु अक्षर गुरू होते.
उदा -
मस्तक
हा शब्द  पाहिला तर 
म स्त क 
u  -   u  
असा लघु गुरूचा क्रम आपण लिहू.
पण वाचतांना स्त या अजोडाक्षराचा आघात म वर येतो. व्याकरण नियमानुसार अश्या ठीकाणी त्या लघु अक्षराला गुरू मानवावे. म्हणजेच इथे म लघु असला तरी तो गुरू समजावा लागतो.

अनुस्वार
ज्या स्वरावर अनुस्वार आला असेल तो स्वर किंवा व्यंजन दिर्घ  समजावे.
उदा. नंतर 

विसर्ग - 

जर काव्यचरणात विसर्ग युक्त स्वर आला तर ज्या स्वर किंवा व्यंजनानंतर  विसर्ग आला त्याला दिर्घ समजावे.

उदा.- 
दु: ख येथे दु -हस्व असला तरी त्यानंतर विसर्ग  आला असल्यां मुळे दु वर आघात येतो. म्हणून दु ला गुरू मानावे.

जर काव्य पंक्तिच्या शेवटी लघु अक्षर येत असेल  तर ते दिर्घ उच्चारले जातील तर त्याला गुरू मानावे.


ही दोन्ही अक्षरे इंग्रजी भाषेत उपयोगाची आहेत मराठी भाषेत सरळ उपयोग होत नाही. आणि यांना नविन स्ववर म्हणून मान्यता  दिली आहे. याचा उपयोग अजून तरी मराठीत फक्त इंग्रजी शब्दांच्या उच्चारणासाठीच केला जातो. व मराठी काव्यरचनेत आपण इंग्रजी.स्वरांचा वापर करत नाही. पण अ + य = अॅ जर म्हटल तरी ते गुरू येइल. व आॅ सरळ गुरूच येइल.

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

अभंग

अभंग 

ताम्र क्षितीजांची,एक सांज भोळी
शाल पांघरली,आसमंती 

कृष्णास देखोनी,तुळस लाजली
पणती पेटली,वृंदावनी

चांदणे फुलले,आठवता सखा
हृदयाचा ठोका,चुकवूनी

चंद्र गोरा मोरा,रुप सोज्वळ ते
साजन मुखी ते,तेजाळले

सडा गुलाबांचा,अंथरुन ल्याले
दिप मंदावले,रात्रीला ते

- सोमनाथ पुरी

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

पत्रलेखन

पत्रलेखन ही एक कला आहे ज्यात आपण आपल्या मनाची भावना शब्दांद्वारे व्यक्त करतो. कधीकधी असे होते जेव्हा आपण व्यक्तीस आपल्या मनात उद्भवलेल्या विचारांचे आणि भावना व्यक्त करू शकत नाही, तर आम्ही त्या भावना आणि विचारांना पत्राने सहजपणे व्यक्त करू शकतो.शब्दांद्वारे शब्दांद्वारे व्यक्त केलेले भाव नेहमी आपल्यासोबत असतात. हृदयाशी जोडण्यासाठी, माहितीचे देवाणघेवाण करणे, समाजात जागरुकता पसरविणे आणि प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
      आपण जितके वारंवार आपल्याला हवे तितके अक्षरे वाचू आणि जितक्या वेळा शक्य तितके आनंद घेऊ.आजही, दूरसंचार क्रांतीमुळे मोबाईल डिव्हाइसेसमुळे तथापि, पत्रांचे महत्त्व कमी झाले नाही. आजही, घनिष्ठ संबंध जतन करण्यासाठी सरकारी आणि व्यवसायासाठी पत्र आवश्यक आहेत. म्हणूनच पत्र हे अभिव्यक्तीचे एक शक्तिशाली आणि सुलभ माध्यम आहे.


पत्र मुख्यतः दोन प्रकारचे आहेत-

  • औपचारिक पत्र - सरकारी कार्यालये, प्राचार्य, प्रकाशक, व्यावसायिक संस्था, दुकानदार इत्यादींसाठी लिहून ठेवलेले असे पत्र औपचारिक पत्रांच्या श्रेणीमध्ये येतात.
  • अनौपचारिक पत्र - जवळचे नातेवाईक, मित्र, परिचित, इत्यादींसाठी लिहिलेले असे पत्र अनौपचारिक पत्रअसे म्हणतात. यांना वैयक्तिक पत्र असेही म्हटले जाते.

चांगला पत्र लिहिण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा:

  • प्रभावी लेखन: आपला पत्र प्रभाव टाकणारे असले पाहिजे. 
  • सोपी भाषा शैलीः वाचक समजू शकेल अशी सोपी भाषा वापरा.
  • थोडक्यात: पत्र नेहमी थोडक्यात लिहावे, अनावश्यक पाल्हाळ लावू नका.
  • क्रमिकरण: विषयानुसार पत्र क्रमवारीत लिहा.
  • शब्दलेखन सुधारणाः मात्रा आणि विरामचिन्हे यांच्यात चुका करू नका.
. औपचारिक पत्रलेखन
                                             २३२८, दळवी गल्ली
                                             कुरुंदा ४२१५१२
                                             १० आॕगस्ट, २०२०


प्रति,
व्यवस्थापक 
मेहता बुक पब्लिकेशन,
पुणे - ४११०३०
दिनांक  १०/०८/२०२०


  महोदय,

          आपल्या प्रकाशनाच्या पुस्तकांची माहिती मला मिळाली.  मला अभ्यासासाठी काही पुस्तकांची आवश्यकता आहे. कृपया खालील पुस्तकांच्या दोन-दोन  प्रती खाली दिलेल्या माझ्या पत्यावर पाठवण्याची कृपा करावी .

पुस्तकाचे नाव                                लेखक
१.सुगम मराठी व्याकरण-लेखन      मो. रा. वाळंबे
२.शुद्धलेखन परिचय                    मो. रा. वाळंबे
३.इंग्रजी मराठी डिक्शनरी             सोहोनी
४.अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण      ओक


                                              आपला विश्वासू 
                                                शुभम दळवी


२) अनौपचारिक पत्रलेखन


232, गांधी नगर ,
मुंबई -400 037
दिनांक : 13.12.2018



प्रिय मित्र रमेश यास,

     सप्रेम नमस्कार.

        मित्रा रमेश कसा आहेस ? सर्व मजेत ना ? माझ सर्व ठीक चालल आहे. येत्या १६ डिसेम्बर ला तुझा वाढ दिवस येतोय  त्या शुभ दिनासाठी माझ्या तर्फे तुला खुप खुप शुभेच्छा .माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत आहेत. तुझ्या साठी भेटवस्तू म्हणुन तुला आवडणारे शिवजी सावंत लिखित " छावा " ही कादंबरी सोबत पाठवली आहे . आशा आहे तुला ते जरूर आवडेल आणि तुझ्या साठी लाभदायी ठरेल.

       परत एकदा खुप खुप अभिंनदन.

                                                        तुझा मित्र
                                                           सुरेश




प्रयोग व प्रकार

*प्रयोग व त्याचे प्रकार*

*वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.*

*मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.*

1) कर्तरी प्रयोग
2) कर्मणी प्रयोग
3) भावे प्रयोग

1. *कर्तरी प्रयोग (Active Voice) :*

जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.

उदा .

तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)ते चित्र काढतात. (कर्ता- वचन)

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

1. सकर्मक कर्तरी प्रयोग
2. अकर्मक कर्तरी प्रयोग

1. सकर्मक कर्तरी प्रयोग :

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

राम आंबा खातो.सीता आंबा खाते. (लिंग)ते आंबा खातात. (वचन)

2. अकर्मक कर्तरी प्रयोग :

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

राम पडलासिता पडली (लिंग)ते पडले (वचन)

2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) :

क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.

उदा .

राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
2. नवीन कर्मणी प्रयोग
3. समापन कर्मणी प्रयोग
4. शक्य कर्मणी प्रयोग
5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग :

हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरनातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.

उदा.

नळे इंद्रास असे बोलीले.जो – जो किजो परमार्थ लाहो.

2. नवीन कर्मणी प्रयोग : 

ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.

उदा .

रावण रामाकडून मारला गेला.चोर पोलिसांकडून पकडला गेला.

3. समापण कर्मणी प्रयोग :

जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

त्याचा पेरु खाऊन झाला.रामाची गोष्ट सांगून झाली.

4. शक्य कर्मणी प्रयोग :

जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

आई कडून काम करविते.बाबांकडून जिना चढवितो.

5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग :

कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

त्याने काम केले.तिने पत्र लिहिले.

3. भावे प्रयोग :

जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा .

सुरेशने बैलाला पकडले.सिमाने मुलांना मारले.

भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात.

1. सकर्मक भावे प्रयोग
2. अकर्मक भावे प्रयोग
3. अकर्तुक भावे प्रयोग

1. सकर्मक भावे प्रयोग :

ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.

उदा.

शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.रामाने रावणास मारले.

2. अकर्मक भावे प्रयोग :

ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात

उदा .

मुलांनी खेळावे.विद्यार्थांनी जावे.

3. अकर्तुक भावे प्रयोग :

भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा .

आता उजाडले.शांत बसावे.आज सारखे उकडते.

टोकाई

स्थळकाव्य: टोकाई
(वसमत जि. हिंगोली)
टोकाई

षट्कोणी ही बारव
आहे निजामकालीन
गडी देवी ती टोकाई 
जसी पहाडी वाघीन

तळ कुणी न पाहिला
अशी ख्याती बारवेची
गुप्त धनाच्याही कथा
कल्पकता ती जनाची

स्थळ हे निसर्गरम्य
श्रावणात गडावर
हिरवळ शोभे सारी
पानोपानी वृक्षांवर

भरे दस-याला यात्रा
टोकाईच्या माळावर
भक्त सारे दर्शनाला
येती पायी चढावर

थाटे दुकाने प्रसादी
मुरमुरे बत्ताशांची
खेळण्याच्या दुकानातं
होई गर्दीही मूलांची

- सोमनाथ पुरी