एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना !
चिरंतन ज्ञानाची साधना !
ज्ञान हेच संजीवन सा-या जगताच्या जीवना !! धृ !!
ज्योत जागवू सुजाणतेची सकलांच्या अंतरी !
तीच निवारील पटल तमाचे प्रभात सूर्यापरी !
ज्ञानच देऊळ, ज्ञानच दैवत, प्रगतीच्या पूजना !! १ !!
नव्या युगाचा नव्या जगाचा ज्ञान धर्म आहे !
त्यातच आमुच्या उजळ उद्याचे आश्वासन राहे !
मुक्त करील तो परंपरेच्या बंदीघरातुन मना !! २ !!
हाच मंत्र नेईल आम्हाला दिव्य भविष्याकडे !
न्याय नितीचे पाऊल जेथे भेदाशी ना अडे !
जे जे मंगल पावन त्याची जेथे आराधना !! ३ !!
- कुसुमाग्रज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा