उपक्रम- एका पुस्तकाची तोंडओळख
सांगत्ये ऐका
आत्मकथन-हंसा वाडकर
प्रस्तावना:- प्रा. वा. ल. कुलकर्णी
मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (द.)
दि. ८/१०/१९६९
प्रकाशक:- दिलीप माजगावकर
राजहंस प्रकाशन, पुणे
#प्रस्तावना
श्रीमती हंसा वाडकर यांचे आत्मचरित्र वाचले. ते त्रोटक आहे, अपुरे आहे, त्यात ब-याचशा जागा को-या सुटलेल्या आहेत; परंतु म्हणूनच की काय कोणास ठावूक ते मनाला विलक्षण चटका लावून जाते. हंसाबाईंनी खूप अनुभवले आहे, खूप सोसले आहे. त्यांना माणसांचा आलेला अनुभव हा चांगल्या पेक्षावाईटच अधिक आहे. परंतु त्यांच्या वाणीत व लेखणीत विखार नाही. तिच्यातून त्यांच्या मनाच्या वेदना अनेकदा ठिबकत असल्या, तरी कोठेही वृत्तीचा कडवटपणा उतरत असल्याची शंकाही येत नाही. ही किमया अपूर्व आहे. मोठमोठ्यांना जे साधत नाही व साधलेले नाही ते येथे एका शाळा-काॕलेजात न गेलेल्या स्त्रीने सहजगत्या साधले आहे. कदाचित ती शाळा-काॕलेजात गेली नाही, जीवनाच्या प्रचंड विद्यापीठातच शिकली, म्हणून तर हे साधले नसावे ना? एक प्रकारच्या निरागस वृत्तीने हंसाबाई आपल्या जीवनाकडे पाहात आहेत व त्याचे कथन करीत आहेत. ह्या सर्वच कथनातून व्यक्त होणारा उदार समंजसपणा -- ह्या समंजसपणाला सर्वत्र दुःखाची किनार आहे -- 'सांगत्ये ऐका' या आत्मकथनाची पातळी एक सारखी उंचावीत आहे. बरेचसे अबोल असलेले हे हंसाबाईचे आत्मचरित्र अत्यंत बोलके आहे.मराठीत आत्मगौरव, आत्मसमर्थन, आत्मस्पष्टीकरण, आत्मप्रदर्शन ह्या उद्देशांनी लिहिलेली आत्मचरित्रे बरीच आहेत. ह्यांतील अनेकांतून व्यक्त होते ती विलक्षण आत्म संतुष्टता. आत्मसंतुष्टता आणि वृत्तीचा समाधानीपणा ह्यात महदंतर आहे. हंसाबाईच्या आत्मकथनाला आत्मसंतुष्टतेचा दुर्गंध कसा तो येत नाही. सुगंध येतो तो दारुन असमाधानाचा आणि उदार समंजसपणाचा. सत्य हे अनेकदा भिषण असते. आपल्याच जीवनाचे सत्य आपणच अवलोकणे सोपे नसते. हे अग्निदिव्य हंसाबाईंनी केलेले आहे. सत्याचे दर्शन मानवाला अन्तर्मुख करतेच. हंसाबाईच्या आत्मचरित्रात अवतरलेली ही अन्तर्मुखताच त्याला नकळत एका वरच्या पातळीवर नेत आहे. हंसाबाईच्या जवळ विद्वत्ता नाही, आपल्या जीवन कथेला गोंडस रुप देणौयासाठी आवश्यक असलेली वांड्.मय कलात्यांनी हस्तगत केलेली नाही. त्यांच्याजवळ आहे ते जानतेपणे, अजाणतेपणे, डोळे उघडे ठेवून व आंधळेपणाने अनुभवले, उपभोगले सोसले ते ते. त्यांची ही कहाणी आहे. मराठी आत्मचरित्रात्मक लेखनात ती आपल्या ह्या प्रकृतिवैशिष्ट्यामूळे वेगळी उमटून पडणार आहे. हंसाबाई जे व्यक्त करु शकल्या नाहीत त्याबद्दल त्यांना दोष देण्याऐवजी त्या जे व्यक्त करु शकल्या आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
संकलन- सोमनाथ पुरी